Most Runs In T20 International : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर १११ सामन्यात ३,८५६ धावा असून, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. कोहलीची फलंदाजीची सरासरी ५२.८२ फॉर्मेटमधील सर्वोत्तम आहे.
Most Runs In T20 International
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मिळून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७,६५० धावा केल्या आहेत. सर्वात लहान फॉरमॅट टी-२० मध्ये कोणत्याही फलंदाजी जोडीद्वारे केलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे.
कोहलीच्या खालोखाल भारतीय कर्णधार रोहित शर्मा ३,७९४ धावांसह आहे . रोहितने सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ४ शतके झळकावली आहेत, जी कोणत्याही खेळाडूची सर्वाधिक आहे.
या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल १२२ टी-२० मध्ये ३,५३१ धावा त्याने २० अर्धशतके आणि १७३ षटकार ठोकले आहेत
पाकिस्तानचा बाबर आझम याने ९३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३,२३१ धावांसह तो चौथ्या स्थानावर आहे.
आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग ११९ सामन्यांमध्ये ३,१३३ धावांसह T20I मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
खेळाडू | मॅच | धावा | सरासरी | एसआर | १००/५० |
विराट कोहली | १११ | ३८५६ | ५२.८२ | १३८.४५ | १/३५ |
रोहित शर्मा | १४४ | ३७९४ | ३१.८८ | १४०.३१ | ४/२९ |
मार्टिन गप्टिल | १२२ | ३५३१ | ३१.८१ | १३५.७० | २/२० |
बाबर आझम | ९३ | ३२३१ | ४३.०८ | १२९.६० | २/२९ |
पॉल स्टर्लिंग | ११९ | ३१३३ | २८.७४ | १३४.६९ | १/२१ |