विराट कोहलीचा ( Virat kohli Information in Marathi) जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीमध्ये झाला. त्याचे वडील प्रेम कोहली हे व्यवसायाने वकील आहेत.
तीन वर्षाचा असताना विराट आपल्या वडिलांना गोलंदाजी करायला सांगत असे. जन्मत:च क्रिकेट कौशल्य पाहून वडिलांनी त्याला १९९८ साली पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश घेण्यास प्रोत्साहन दिले. तेथेच त्याच्या क्रिकेटमधील उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी झाली.
वैयक्तिक माहिती | Virat Personal Life
पूर्ण नाव | Name | विराट कोहली |
जन्म | BIrthday | ५ नोव्हेंबर, १९८८ (वय: ३२) |
जन्म ठिकाण | Birth Place | दिल्ली, भारत |
उंची | Height | ५ फु ९ इं (१.७५ मी) |
आईचे नाव | Mother Name | सरोज कोहली |
वडिलांचे नाव | Father Name | प्रेमजी कोहली |
पत्नीचे नाव | Wife Name | अनुष्का शर्मा (बॉलिवूड अभिनेत्री) |
विशेषता | Attribute | फलंदाज |
फलंदाजीची पद्धत | Method of batting | उजखोरा |
गोलंदाजीची पद्धत | Method of bowling | उजव्या हाताने |
सुरुवातीचे जीवन । Virat Early Life
विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर, १९८८ ( Virat kohli Information in Marathi) रोजी दिल्लीतील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील प्रेमजी कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी आहे.
त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे.
कोहली उत्तम नगर मध्ये लहानाचा मोठा झाला आणि विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण सुरू झाले.
१९९८ साली, पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीची स्थापना झाली, आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता.
“विराटने गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालविण्याऐवजी त्याचे नाव एका व्यावसायिक क्लबमध्ये नोंदवा”, असे शेजाऱ्यांनी सुचविल्यानंतर कोहलीचे वडील त्याला अकादमीमध्ये घेऊन गेले.
अॅकाडमीमध्ये कोहलीने राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्यावेळी नोयडा जवळच्या सुमित डोग्रा अकादमीकडून ही तो सामने खेळला.
नववीमध्ये असताना क्रिकेट सरावासाठी मदत म्हणून त्याने दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहातीमधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला.
मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यावर असलेल्या कोहलीच्या वडीलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले.
कुटुंब । Family
त्याचे वडील प्रेम कोहली ( Virat kohli Information in Marathi) गुन्हेगारी वकील म्हणून काम करत होते आणि आई सरोज कोहली गृहिणी आहेत.
त्याचा एक मोठा भाऊ विकास आणि एक मोठी बहीण भावना आहे.
virat kohli anushka sharma
virat kohli daughter
विराट कोहलीचे वैवाहिक जीवन । Virat Kohli Married Life
बातम्यांनुसार सराह जाने दिस ही त्यांची पहिली गर्लफ्रेंड होती. ती मिस इंडिया असल्या सोबत बॉलिवूड अभिनेत्री देखील होती. ती काही वेळेस विराटचे सामने देखील पाहायला गेली आहे. परंतु हे नाते त्यांचे जास्त वेळ टिकले नाही. मॉडेल संजना शी त्याचे नाव जोडले गेले परंतु त्यांनी ह्या नात्याला फक्त अफवा असून चांगले मित्र आहोत असे सांगितले. तमन्ना भाटिया साऊथ ची अभिनेत्री आणि विराटची भेट एका जाहिराती दरम्यान झाली आणि नंतर त्यांच्या अफेअर च्या बातम्या बाहेर आल्या, हेही संबंध फारसे टिकले नाही. ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री इजाबेल लिइट भारतात कामानिमित्त एका वर्षाहून अधिक वेळ राहिल्या तेव्हा त्यांची आणि विराटची डेटींग ची बातमी बाहेर आली, परंतु जास्त काळ टिकले नाही.
२०१३ मध्ये विराट कोहलीची ओळख अभिनेत्री अनुष्का शर्मा शी (virat kohli anushka sharma) एका ॲड दरम्यान झाली. नंतर त्यांची चांगली मैत्री झाली आणि ती मैत्री हळू हळू प्रेमामध्ये वळु लागली. त्यांच्या अफेअर आणि डेटिंग च्या बातम्या बाहेर येऊ लागल्या. अनुष्का विराटच्या क्रिकेट सामना पहायला देखील जायची. अखेर ११ डिसेंबर २०१७ मध्ये विराटचे नाव अनुष्काशी जोडले गेले म्हणजेच त्यांचे इटली येथे लग्न झाले.
करिअर | Virat Kohli Career
२००२ साली विराट यांची निवड ही अंडर १५ साठी झाली आणि त्यात त्यांनी अनेक सामने देखील खेळले.
२००२ साली झालेल्या पॉली उमरीगर ट्रॉफी मध्ये त्यांनी सर्वाधिक रन्स देखील बनवले. २००४ मध्ये त्यांनी अंडर १७ देखील खेळले.
विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये विराट यांनी ४ सामन्यांमध्ये २ शतक झळकवत ४७० रन बनवले. त्यांच्या या प्रदर्शनामुळे त्यावर्षी विजय मर्चंट ट्रॉफी दिल्ली संघाने जिंकली. दिवसेंदिवस त्यांच्या खेळामध्ये सुधारणा होतच राहिली.
त्यामुळे २००६ मध्ये त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये निवड देखील झाली. २००६ मध्ये त्यांनी पहिला सामना हा तामिळनाडू विरोधात खेळला. पहिल्या डावात त्यांना मात्र १० रन बनवता आले परंतु त्यांनी पुढील सामन्यात कर्नाटक संघाच्या विरोधात ९० रन बनवले.
२००६ साली त्यांनी आधार गमावला होता. त्यांनी क्रिकेट खेळात करियर करावे म्हणून धडपडणारे त्यांचे वडील प्रेमजी कोहली यांचे निधन झाले होते.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय करियर
१९ वय असताना विराट यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये निवड देखील झाली. सचिन आणि सेहवाग हे दोन्ही भारतीय सलामीवीर जखमी असल्याने विराट यांना संघात स्थान मिळाले.
विराटने पहिला सामना हा वयाच्या १९ व्या वर्षी श्रीलंका संघाच्या विरोधात खेळला. पहिल्या सामन्यात विराट हे केवळ १२ धावा बनवू शकले. परंतु त्यांनी चौथ्या सामन्यात ५४ धावांची खेळी करत पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले.
२०१० मध्ये विराट यांना एशिया कप मध्ये सर्व सामने खेळायला मिळाले परंतु त्यांचे प्रदर्शन काही खास राहिले नाही. फॉर्म काही ठीक नव्हता परंतु एक चांगला खेळाडू कधीही कमाल करू शकतो याची जाणीव निवड समितीला होती. त्यामुळे पुढेही विराटला खेळण्याची संधी मिळत राहिली.
२०११ वर्ल्ड कप मध्ये विराट यांची निवड देखील झाली. वर्ल्ड कप मध्ये देखील त्यांनी त्यांची कामगिरी तशीच सुरू ठेवली. पहिल्याच बांगलादेश विरुद्ध सामन्यांमध्ये विराटने १०० रणांची खेळी करत भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळवून दिला.
या शतकाने त्यांना भारताकडून विश्वचषक स्पर्धेत पहिल्या सामन्यात शतक ठोकणार्ऱ्या पहिल्या खेळाडूचा मान मिळवून दिला. पुढे जाऊन त्यांचे प्रदर्शन तसे जास्त खास नव्हते परंतु अखेरच्या सामन्यात त्यांनी गौतम गंभीरला साथ देत बनवलेले ३५ रन हे खूप महत्वाचे होते. अखेर भारताने हा २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकला!
टी-२० करिअर
- २०१० साली विराट कोहली यांनी टी-२० मध्ये पदार्पण केले.
- २०१२ मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यांनी पहिले टी-२० अर्धशतक झळकावले.
- २०१४ च्या टी-२० विश्वचषकात विराट कोहली यांचे प्रदर्शन अगदी खास राहिले. भारतात सेमिफायनल मध्ये विजयासाठी १७३ धावा क-याच्या होत्या तेव्हा ४४ चेंडूत ७२ धावा बनवून विराट कोहली यांनी त्यांच्या करियरची सर्वात उत्कृष्ट खेळी केली होती.
- २०१९ मध्ये वेस्ट इंडिज विरोधात ९४ धावांची खेळी करत सर्वाधिक रन बनवले. विराट हे भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय करियर मध्ये ३००० रन बनवणारे पहिले खेळाडू आहेत.
- २६ सप्टेंबर २०२१ मध्ये त्याने टी-२० मध्ये एकूण ३१४ मॅच खेळून १०००० रनचा पल्ला गाठला.
२०२२ आशिया कपच्या भारत वि अफगाणिस्तान दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात कोहलीने त्याचे पहिले T20I शतक झळकावले आणि तो T20I मध्ये शतक झळकावणारा ५वा भारतीय फलंदाज बनला आणि सर्व फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा चौथा एकंदरीत फलंदाज ठरला.
Thank you for all the love and support throughout the Asia Cup campaign. We will get better and come back stronger. Untill next time ❤️🇮🇳 pic.twitter.com/yASQ5SbsHl
— Virat Kohli (@imVkohli) September 9, 2022
हे त्याचं ७१ वे शतकही होतं आणि हे शतक बऱ्याच काळानंतर आलं आहे. २०१९-२० मध्ये त्याने बांगलादेशी क्रिकेट संघात शेवटचे शतक झळकावले होते.
कसोटी क्रिकेट करियर
- २०११ साली विराटने कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
- कसोटी क्रिकेट मध्ये देखील त्यांनी त्यांचा फॉर्म हा कायम ठेवत सुरुवातच दमदार केली.
- वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटी मालिकेत त्यांना यश मिळाले नाही.
- त्याच वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील त्यांना संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या या मालिकेत त्यांनी सर्वाधिक रन तर बनवलेच परंतु अखेरच्या सामन्यात ११६ रन बनवत कसोटी क्रिकेट मधील पहिले शतक देखील झळकावले.
- पुढे बांगलादेश आणि इंग्लंड संघाच्या विरोधी खेळल्या गेलेल्या सलग दोन मालिकांमध्ये द्विशतक बनवणारे ते पहिले खेळाडू बनले.
- २०२१ पर्यंत विराटने टेस्ट मध्ये ९६ मॅच खेळत ७७६५ रन बनिवले आहेत ज्यात २७ शतक आणि २७ आर्धशतक आहेत.
- १५ जानेवारी २०२२ रोजी, दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेनंतर त्याने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर त्याची घोषणा करून भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले
आयपीएल करियर
- विराट यांनी २००८ मध्ये आयपीएल मध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्यांची सुरुवात ही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून झाली परंतू त्यांचे प्रदर्शन हे काही खास नव्हते.
- पुढील २००९ वर्षी मात्र त्यांनी चांगले प्रदर्शन केले आणि त्यांची टीम ही उपांत्य सामन्यात देखील पोहोचली.
- २०११ मध्ये उप कप्तान आणि पुढे डॅनियल विटोरी यांच्या जखमी असल्याने कप्तान म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.
- २०१३ साली डॅनियल व्हीटोरी निवृत्त झाल्यानंतर विराट यांच्याकडे रॉयल चॅलेंजर्स चे कर्णधारपद देण्यात आले.
- २०१६ हे वर्ष त्यांच्यासाठी जास्त खास राहिले कारण तेव्हाच त्यांनी जवळपास ८१ च्या सरासरीने १६ मॅच मध्ये सर्वाधिक रन बनवले.
पुरस्कार
सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी (ICC क्रिकेटर ऑफ द इअर) : २०१७, २०१८ |
सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी (ICC क्रिकेटर ऑफ द डिकेड) : २०११, २०२० |
आयसीसी ओडीआय प्लेयर ऑफ द इअर : २०१२, २०१७ , २०१८ |
आयसीसी टेस्ट प्लेयर ऑफ द इअर : २०१८ |
आयसीसी स्पिरिट ऑफ द क्रिकेट : २०१९ |
आयसीसी मेन्स क्रिकेटर ऑफ द डिकेड : २०११ , २०२० |
पॉली उमरीगर अवॉर्ड फॉर इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इअर : २०१४ , २०१५, २०१६, २०१७ |
विसडन लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड : २०१६, २०१७, २०१८ |
CEAT इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इअर : २०११-१२, २०१३-१४, २०१८-१९ |
पीपल्स चॉईस अवॉर्ड इंडिया फॉर फेव्हरेट स्पोर्टसमनशिप : २०१२ |
सोशल मीडिया | Social Media Accounts
इंस्टाग्राम | Virat kohli Instagram Id
फेसबुक। Virat kohli Facebook Id
ट्वीटर । Virat kohli twitter Id
My 🌍♥️ pic.twitter.com/LCVVHTsfFh
— Virat Kohli (@imVkohli) September 2, 2022
प्रश्न । FAQ
प्रश्न : विराट कोहलीच्या वडिलांचे नाव काय?
उत्तर : प्रेम कोहली
प्रश्न : विराट कोहलीचा जन्म कोठे झाला होता?
उत्तर : नवी दिल्ली
प्रश्न : विराट कोहलीच्या नावावर किती शतक आहेत?
उत्तर : २०२१ पर्यंत त्याने ७० शतके ठोकली आहेत.
प्रश्न : विराट कोहली किती कसोटी सामने खेळला?
उत्तर : ७९ सामने
प्रश्न : विराट कोहलीने क्रिकेट कधीपासून सुरू केले?
उत्तर : कोहलीने १८ ऑगस्ट २००८ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात प्रवेश केला होता.