रोहित शर्मा मराठी माहिती | Rohit Sharma Information in Marathi 2023

रोहित गुरुनाथ शर्मा (Rohit Sharma Information in Marathi) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे जो भारतीय राष्ट्रीय संघाचा सध्याचा कर्णधार आहे.

Rohit Sharma Information in Marathi
Advertisements

शर्माच्या नावावर सध्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा (२६४) जागतिक विक्रम आहे आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे.

वैयक्तिक माहिती । Personal Information

पूर्ण नावरोहित गुरुनाथ शर्मा
जन्मतारिख३० एप्रिल १९८७
जन्मस्थाननागपूर, महाराष्ट्र, भारत
वडिलांचे नावगुरुनाथ शर्मा
आईचे नावपूर्णिमा शर्मा
पत्नीचे नावरितिका सजदेह
मुलसमीरा
विशेषताफलंदाज
फलंदाजीउजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने ऑफब्रेक
राष्ट्रीयत्वभारतीय
उपलब्धीअर्जुन पुरस्कार (२०१५)
Advertisements

आकाश चोप्रा माहिती

सुरुवातीचे जीवन

रोहित शर्माचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी भारतीय राज्यातील नागपूर जिल्ह्यातील बनसोड भागात झाला. त्याची आई पूर्णिमा शर्मा असून ती विशाखापट्टणममधील आहे. तर त्याचे वडील गुरुनाथ शर्मा जे एका परिवहन कंपनीत देखरेख करत आहेत.

वडिलांचे उत्पन्न खूपच कमी असल्याने शर्मा यांचे संगोपन आजोबा आणि काका यांच्या बरोबर बोरीवली येथे झाले. त्याला विशाल शर्मा नावाचा एक छोटा भाऊ आहे.

रोहितने १९९९ मध्ये आपल्या काकाच्या उत्पन्नातून क्रिकेट शिबिरात खेळायला सुरुवात केली.

त्यावेळी रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड होते आणि ते म्हणाले की तू तुझी शाळा स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत बदलली पाहिजे कारण लाड तेथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते, जेणेकरुन रोहितला क्रिकेट खेळण्याची अधिक सुविधा मिळावी.

रोहितने ऑफस्पिनर म्हणून क्रिकेट कारकीर्दीची सुरूवात केली पण नंतर लाडने शर्माला सल्ला दिला की तुझाकडे फलंदाजी करण्याची अधिक क्षमता आहे म्हणून एक चांगला फलंदाज होण्याचा प्रयत्न करा.


मनोज सरकार पॅरा-बॅडमिंटनपटू

रोहित शर्मा करिअर

सुरुवातीचे क्रिकेटचे दिवस

मार्च २००५ मध्ये देवधर ट्रॉफीमध्ये वेस्ट जॉनकडून सेंट्रल जॉन विरुद्ध ग्वालिअर येथे लिस्ट ए क्रिकेटने रोहितची क्रिकेटची सुरुवात झाली. नंतर त्याच प्रतियोगितेत रोहितेने धडाकेबाज फलंदाजी करत १२३ चेंडूंवर १४२ धावा केल्या.

ते शतक रोहितसाठी खूपच फायद्याचे ठरले. त्यानंतर अबूधाबी येथे भारत अ संघाकडून खेळताना रोहितने सरस खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ३० सदस्यांमध्ये निवडले गेले. परंतु अंतिम संघात रोहितची निवड झाली नाही. मात्र नंतर रणजी ट्रॉफीमध्ये रोहितला स्थान मिळाले.

जुलै २००६ मध्ये डार्विन येथे न्यूझीलंड विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रोहितने पाऊल ठेवले. रणजी ट्रॉफी कारकिर्दीची सुरुवात रोहितने मुंबई संघाकडून २००६/०७ मध्ये केली. त्यावेळी रोहितने गुजरात संघाविरुद्ध २६७ चेंडूमध्ये २०५ धावा केल्या होत्या. रोहितने अंतिम सामन्यात बंगाल विरुद्ध अर्धशतक केले.

अजित आगरकरने ऑक्टोबर २०१३ मध्ये क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यावर रोहित आय पी एल सामन्यांसाठी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार झाला. आतापर्यंत तोच सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.


प्रज्ञानंधा रमेशबाबू बुद्धिबळपटू
Advertisements

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

Rohit Sharma Information in Marathi

नियमित षटकांच्या खेळासाठी २००७ च्या आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाकडून रोहितची निवड झाली.

त्यानंतर त्याने बेलफास्टमध्ये आयर्लंड विरुद्ध एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली, परंतु त्या सामन्यात रोहितला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

नंतर २० सप्टेंबर २००७ रोजी आय सी सी विश्व ट्वेन्टीट्वेन्टी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४०चेंडूत झटपट ५० धावा केल्या. तो सामना जिंकल्यामुळे भारत प्रतियोगितेच्या उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला. त्या सामन्यात भारताने केवळ ६१ धावांवर ४ गडी गमावले होते.

रोहितने कर्णधार महेन्द्रसिंग धोनी बरोबर ८५ धावांची भागीदारी केल्यामुळे भारत १५३ धावांपर्यंत मजल मारू शकला. रोहितला सामनावीर निवडले गेले. त्याच टी-२० मालिकेत अंतिम सामन्यात रोहितने पाकिस्तानविरुद्ध १६ चेंडू खेळून ३० धावा केल्या.

१८ नोव्हेंबर २००७ रोजी राजस्थानच्या जयपुर सवाई मानसिंग स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्माने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक केले.

डिसेंबर २००९ मध्ये रोहितने रणजी ट्रॉफीच्या एका सामन्यात नेत्रदीपक तीन शतके केली. ज्यामुळे निवड समितीला रोहितच्या काही काळ असमाधानी कामगिरीकडे दुर्लक्ष करून त्याला संघात पुन्हा स्थान द्यावेच लागले. त्यानंतर बांगलादेशमधील एक दिवसीय सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकरला विश्रांती देऊन त्रिकोणी शृंखलेत रोहितला खेळवण्यात आले.

रोहितने पहिले एक दिवसीय शतक २८ मे २०१० रोजी झिंबाब्वेविरुद्ध नोंदवले. त्याने ११४ धावा केल्या. ३० मे २०१० रोजी रोहितने त्रिकोणी शृंखलेमध्ये श्रीलंकेविरुद्ध झंझावाती नाबाद ११० धावा केल्या.

२०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी रोहित शर्माला मिळाली आणि रोहितचा प्रभावी फॉर्म सुरूच राहिला, नंतर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला.

त्या शृंखलेत रोहितने एका सामन्यात जयपूरमध्ये १४१ धावा केल्या व बाद झाला, परंतु बेंगलूरू येथील सामन्यात १५८ चेंडूमध्ये २०९ धावा केल्या.

नोव्हेंबर २०१३ मध्ये कोलकाता येथे ईडन गार्डन्स मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध रोहित सामना खेळला. त्यात १७७ धावा करणारा रोहित पहिल्या कसोटी सामन्यात शतक करणारा दुसरा खेळाडू होता.

२ ऑक्टोबर २०१५ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये एच पी सी ए स्टेडियम धर्मशाला, हिमाचल प्रदेश येथे रोहितने देदीप्यमान फलंदाजी करत १०६ धावा काढल्या आणि तो टी-२० सामन्यामध्ये शतक ठोकणारा दुसरा खेळाडू ठरला.

१५ एप्रिल २०१९ रोजी शर्मा यांची इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०१९ विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली . दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात , त्याने १२२ धावा केल्या, ज्यात त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १२,००० धावांचा समावेश आहे.

त्यानंतर त्याने पाकिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध शतके झळकावली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात, आणखी एक शतक ठोकून, एकाच विश्वचषक स्पर्धेत पाच शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला, आणि विश्वचषकातील सर्व सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके (६) करण्याच्या सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. शर्माने स्पर्धेत एकूण ६४८ धावा केल्या आणि त्याने सर्वाधिक धावा केल्या आणि आयसीसीचा विजय मिळवला.गोल्डन बॅट पुरस्कार, असे करणारा तिसरा भारतीय खेळाडू

नोव्हेंबर २०२० मध्ये, शर्माला ICC पुरुषांच्या ODI क्रिकेटर ऑफ द डिकेड पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते

जुलै २०२२ मध्ये, शर्मा इंग्लंडमध्ये T20I आणि ODI मालिका जिंकण्यासाठी त्यांच्या संघाचे नेतृत्व करणारा पहिला भारतीय कर्णधार बनला. इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकणारा तो तिसरा भारतीय कर्णधार आणि २०१४ नंतरचा पहिला कर्णधार ठरला


मनु भाकर माहिती

रोहित शर्मा आय पी एल

Rohit Sharma Information in Marathi

रोहित शर्मा आय पी एलच्या यशस्वी खेळाडूंपैकी आहे आणि शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय खेचून आणण्याची कुवत त्याच्यामध्ये आहे.

रोहित शर्माने प्रथम २००८ आय पी एल मध्ये ७५०००० यू. एस. डॉलरच्या अवाढव्य रकमेवर करार केला.

(डेक्कन चार्जर्स संघाकडून) २००८ आय पी एल मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी रोहित शर्मा एक होता. त्याने ३६. ७२ च्या सरासरीने ४०४ धावा केल्या. त्यामुळे त्याला काही सामन्यांमध्ये ऑरेंज कॅप मिळाली.

२००८ ते २०१० पर्यंत रोहित डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळला परंतु २०११ पासून मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. २०१३, २०१७, २०१९, २०२० आणि २०१५ मध्ये त्याने संघाला विजय मिळवून दिला.

ह्या व्यतिरिक्त रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई चार वेळा चॅम्पियन्स लीग टी-२० सुद्धा जिंकली आहे.

तो सध्या (मार्च २०२२) स्पर्धेत कारकिर्दीत ५,००० धावा करणाऱ्या सहा खेळाडूंपैकी एक आहे.


हँडबॉल खेळाची माहिती
Advertisements

उपलब्धी

शर्मा यांनी १३ नोव्हेंबर २०१४ रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे श्रीलंकेविरुद्ध २६४ धावा केल्या होत्या. एका दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात एका फलंदाजाने खेळलेल्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम शर्माच्या नावावर आहे . 

जानेवारी २०२० मध्ये, शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्षातील एकदिवसीय खेळाडू म्हणून घोषित केले.

राष्ट्रीय सन्मान

  • २०१५ – अर्जुन पुरस्कार
  • २०२० – मेजर ध्यानचंद खेलरत्न

क्रीडा सन्मान

  • ICC पुरुषांचा ODI क्रिकेटर ऑफ द इयर : २०१९
  • ICC पुरुषांचा एकदिवसीय संघ सर्वोत्कृष्ट : २०१४ (१२ वा पुरुष), २०१६, २०१७, २०१८, २०१९
  • आयसीसी पुरुषांचा दशकातील एकदिवसीय संघ : २०११-२०२०
  • आयसीसी पुरुषांचा दशकातील टी२०-आय संघ : २०११-२०२०
  • ICC पुरुषांचा वर्षातील कसोटी संघ : २०२१


महेंद्रसिंग धोनी माहिती

रोहित शर्मा वैयक्तिक जीवन

रोहित आणि रितिका । Rohit Sharma Information in Marathi
रोहित आणि रितिका
Advertisements

शर्मा यांनी डिसेंबर २०१५ मध्ये रितिका सजदेहशी लग्न केले. त्यांना एक मुलगी आहे, तिचा जन्म डिसेंबर २०१८ मध्ये झाला आहे.


बुद्धिबळ खेळाची माहिती

सामाजिक माध्यमे । Social media

रोहित शर्मा इंस्टाग्राम अकाउंट


रोहित शर्मा ट्विटर


प्रश्न । FAQ

प्रश्न : रोहित शर्माचा रेकॉर्ड काय आहे?

उत्तर : रोहितने भारताला २८ टी२०I सामन्यांमध्ये २४ विजय मिळवून दिले आहेत , त्यापैकी १७ विजय १८ सामन्यांमध्ये घरच्या मैदानावर मिळाले आहेत.

प्रश्न : रोहित शर्मा अब्जाधीश आहे का?

उत्तर : त्याच्याकडे $१८.७ दशलक्ष (INR १३० कोटी) ची प्रचंड नेट वर्थ आहे.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment