WTC 2023 Team India : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा

WTC 2023 Team India

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर संघाचे कर्णधारपद रोहित शर्मा सांभाळणार आहे.

WTC 2023 Team India
WTC 2023 Team India
Advertisements

बीसीसीआयने मंगळवारी टीम इंडियाची घोषणा केली. या संघातील सर्वात खास बाब म्हणजे अजिंक्य रहाणेचे पुनरागमन. आयपीएलमध्ये रहाणेच्या बॅटने जोरदार गर्जना केली आहे. 

रहाणे १५ महिन्यांनंतर संघात परतला. दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन निश्चित असल्याचे मानले जात होते. अय्यर यांच्या पाठीच्या दुखण्यावर ब्रिटनमध्ये ऑपरेशन झाले आहे. 

माजी कर्णधार अजिंक्य रहाणे ७ ते ११ जून दरम्यान ओव्हल येथे होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी भारतीय संघात परतला आहे. याशिवाय रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत.

टीम इंडियाचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

[irp]

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment