दिल्ली कॅपिटल्सने सामना जिंकला पण वॉर्नर आणि विराटला लाखांचा दंड, जाणून घ्या कारण

दिल्ली कॅपिटल्सने सामना जिंकला पण वॉर्नर आणि विराटला लाखांचा दंड

सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात दिल्लीने हैदराबादचा ७ धावांनी पराभव केला पण स्लो ओव्हर रेटसाठी डेव्हिड वॉर्नरला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

दिल्ली कॅपिटल्सने सामना जिंकला पण वॉर्नर आणि विराटला लाखांचा दंड

आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, “आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत चालू हंगामातील हा संघाचा पहिलाच गुन्हा आहे, त्यामुळे कर्णधार डेव्हिड वॉर्नरला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.”

आयपीएलचे सामने तीन तास आणि २० मिनिटांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, परंतु स्लो ओव्हर रेट ही समस्या बनत आहे कारण बहुतेक सामने ४ तासांहून अधिक लांबले आहेत.

विराट कोहलीला २४ लाखांचा दंड 

त्याचवेळी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीलाही २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विराट कोहली शिवाय त्याच्या संघातील सदस्यांनाही हा दंड भरावा लागणार आहे.

आरसीबीच्या प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट असलेल्या उर्वरित खेळाडू आणि इम्पॅक्ट पर्यायांना ६ लाख रुपये किंवा २५ टक्के मॅच फी यापैकी जे कमी असेल ते दिले जाईल. त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा आरसीबीने स्लोओव्हर रेटशी संबंधित चूक केली.

नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment

Advertisements