सेमीफायनलमध्ये हारल्यानंतर विराट आणि पंड्या भावूक : टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गुरुवारी भारतीय संघाला इंग्लंड संघाने १० विकेट्सने पराभूत केले. या पराभवानंतर भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. संपुर्ण भारतीय प्रेक्षक तसेच खेळाडू या पराभवामुळे खूपच निराश असल्याचे दिसले. अशात सामन्यानंतरचे विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

सेमीफायनलमध्ये हारल्यानंतर विराट आणि पंड्या भावूक
सर्व भारतीय फॅनक्लबला अपेक्षा होती की, २००७ नंतर १५ वर्षांनी भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२२ ( T20 World Cup ) स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर करेल. मात्र, त्यांना हा पराभव खूपच निराश करणारा ठरला. या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी धमाकेदार बॅटींग जरी केली तरी मात्र, निराशाजनक पराभवानंतर हे दोन्ही खेळाडू खुप निराश दिसले.
This picture gives heart-break: Hardik & Kohli after Semis. pic.twitter.com/cYygNMO7i3
— Johns. (@CricCrazyJohns) November 10, 2022
या सामन्यात विराटने अर्धशतक ठोकले होते. त्याने ४० चेंडूत ५० धावा केल्या होत्या आणि पंड्यानेही विस्फोटक फलंदाजी करत ३३ चेंडूत ६३ धावा ठोकल्या. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ६ विकेट्स गमावत १६८ धावा केल्या होत्या. बटलरने ८०, तर ऍलेक्सने ८६ धावांचे योगदान दिले. या सामन्यात इंग्लंडच्या ऍलेक्स हेल्सला त्याच्या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.