रोहित शर्मा T20 विश्वचषक २०२४ नंतर निवृत्ती घेणार
रोहित शर्माने यूएसए मधील एका कार्यक्रमात २०२४ च्या T20 विश्वचषक विषयी बोलत आसताना आपल्या बोलण्यात निवृत्तीच्या योजनांबद्दल एक मोठा इशारा दिला आहे. उल्लेखनीय म्हणजे, T20 विश्वचषक २०२४ पुढील वर्षी जूनमध्ये यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे.
वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय मालिका पूर्ण झाल्यानंतर, रोहित त्याच्या क्रिकेट अकादमी ‘क्रिकिंगडम’ च्या लॉन्चसाठी यूएसएला गेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-० असा विजय मिळवला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध नुकताच पहिला एकदिवसीय सामना खेळला आणि तरुणांना संधी देण्यासाठी पुढील दोन सामन्यांसाठी स्वत:ला विश्रांती दिली.
ऑस्ट्रेलियात झालेल्या २०२२ च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ बाहेर पडल्यापासून भारतीय संघात बरेच बदल दुसून आलेले आहेत. हार्दिक पांड्या टी२०आय फॉरमॅटमध्ये युवा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्यां दिग्गज खेळाडूंनी २०२२च्या T20 विश्वचषकातून भारत बाहेर पडल्यानंतर एकही T20I खेळलेला नाही.
कसोटी संघातही स्थित्यंतर सुरू झाले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषकानंतर एकदिवसीय संघाकडूनही अशीच अपेक्षा केली जात आहे. कोहली, रोहित आणि रवींद्र जडेजा यांच्यासाठी ५० षटकांची मार्की स्पर्धा शेवटची असेल.
रोहित शर्मा सध्या ३६ वर्षांचा आहे आणि २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर तो भारतीय संघासोबत आपले भविष्य कसे ठरवतो हे पाहणे बाकी आहे.
“फक्त जाणे आणि आनंद घेण्यापेक्षा, येथे (यूएसए) येण्याचे आणखी एक कारण आहे. कारण तुम्हाला माहित आहे की विश्वचषक येत आहे. जूनमध्ये, जगाच्या या भागात T20 विश्वचषक (2024) होणार आहे. त्यामुळे, मला खात्री आहे की प्रत्येकजण उत्साही आहे. तर होय, आम्ही त्याची वाट पाहत आहोत,” रोहित व्हिडिओमध्ये म्हणाला.
या बातमीने रोहित शर्माचे चाहते खूश झाले आहे पण २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात आणि रोहितच्या आयपीएल २०२४ मधील कामगिरीवर बरेच काही अवलंबून असेल. जरी त्याने चांगली कामगिरी केली तरी, रोहित भारतासाठी आणखी एक T20I विश्वचषक खेळेल याची फारशी शक्यता नाही आसेच चिन्ह दिसत आहेत.