PAK vs AFG: अफगाणिस्तानने पाकिस्तान विरुद्ध वनडे सामन्यांसाठी संघ जाहीर केला

अफगाणिस्तानने पाकिस्तान विरुद्ध वनडे सामन्यांसाठी संघ जाहीर केला

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) रविवारी श्रीलंकेत २२ ते २६ ऑगस्ट दरम्यान खेळल्या जाणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा केली.

अफगाणिस्तानने पाकिस्तान विरुद्ध वनडे सामन्यांसाठी संघ जाहीर केला
Advertisements

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने १८ वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमद याचा अफगाणिस्तानच्या वनडे संघात समावेश केला आहे. हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखालील संघ या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक आणि आगामी आशिया चषक २०२३ च्या आधी त्यांची टीम मजबूत करण्याकडे लक्ष देत आहे.

बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा डावखुरा फिरकीपटू झिया उर रहमान अकबर आणि अनकॅप्ड लेग-स्पिनर इझारुल्हक नावेद, जो कसोटीचा भाग होता यांचा समावेश संघात करण्यात आलेला आहे.

एसीबीचे मुख्य निवडकर्ता असदुल्लाह खान म्हणाले, “आमची संपूर्ण एकाग्रता आशिया चषक आणि विश्वचषक २०२३ च्या आगामी दोन मोठ्या स्पर्धांसाठी संघ तयार करण्यावर आहे.”

“पाकिस्तानविरुद्धची ही तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आम्हाला आगामी दोन स्पर्धांसाठी संघाला तयार करण्याची उत्तम संधी प्रदान करते.”

“पाकिस्तान मालिकेची तयारी चांगली सुरू आहे. खेळाडूंनी अलीकडेच काबूल कॅम्पमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ज्याचे पर्यवेक्षण एसीबीच्या एचपीसी कर्मचार्‍यांनी केले आहे. पाकिस्तान मालिकेपूर्वी संघ एक आठवडाभर कंडिशनिंग कॅम्प घेणार आहे,” ते म्हणाले.

अफगाणिस्तान एकदिवसीय संघ विरुद्ध पाकिस्तान

हशमतुल्ला शाहिदी (क), रहमानउल्ला गुरबाज, इक्रम अलीखिल, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, अब्दुल रहमान, मोहम्मद सलीम साफी आणि वफादर मोमंद.

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका पूर्ण वेळापत्रक

२२ ऑगस्ट – पहिली वनडे, हंबनटोटा

२४ ऑगस्ट – दुसरी वनडे, हंबनटोटा

२६ ऑगस्ट – तिसरी वनडे, कोलंबो

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment