लगोरी खेळाबद्दल संपूर्ण माहिती | Lagori Information In Marathi

लगोरी (Lagori Information In Marathi) हा खेळ बहुतेक आपण सर्वांनी खेळला असेलच. त्यात सात दगडांच्या चपट्या एकावर एक ठेऊन चेंडू ने त्याला फोडून पळत सुटायचे एका संघाने, तर दुसऱ्या संघाने त्यांना त्याच चेंडू ने मारायचे आणि पहिल्या संघाने पुन्हा ना बाद होता ते सर्व दगड एकावर एक आहे तसे ठेवायचे हे आपल्या सर्वांना माहीत आहेच.

पूर्वी गावाकडचे विविध खेळ आठवायचे. त्यात मग काही खेळ घरात बसून खेळल्या जायचे तर काही मैदानी खेळ असायचे.

कॅरम, चांपुल, चिट्ठ्या, सापशिडी इ. खेळ घरात बसून खेळल्या जायचे. क्रिकेट, आबाधुबी, लगोरी, चोर-पोलीस, खो-खो असे विविध मैदानी खेळ मुलांना आवडायचे.


कुस्ती खेळाची माहिती

लगोरी खेळाचा इतिहास

​लगोरी हा सात दगडांचा खेळ आहे. भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन खेळापैकी एक असा हा खेळ म्हणजे लगोरी.

ह्या खेळाचा इतिहास चक्क भगवत पुराणात सुद्धा सापडलेला आहे. भगवत पूर्ण हा ग्रंथ सुमारे हजारो वर्षापूर्वी लिहिल्याचा दावा केलेला हिंदू धर्म ग्रंथ आहे.

लगोरी हा पारंपरिक खेळ अंदाजे ५ सहस्र वर्षापासून खेळला जात आहे. ह्या खेळाचा मूळ भारतीय उपखंडातील दक्षिणेकडील भागात आढळला आहे असे मानले जाते.

लगोरी हा खेळ १९९० चा दशकात भारत आणि पाकिस्तान मधील सर्वात लोकप्रिय असा खेळ होता.

पण आता हा खेळ फार कमी लोकांच्या हातून खेळला जातो. जवळजवळ हा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावरच आहे. ह्यांची अधिक आक्रमक आवृत्ती जात म्हणजे डॉजबॉल.


नेमबाजी खेळाबद्दल माहिती

लगोरी खेळासाठी लागणारे साहित्य

Lagori Information In Marathi

लगोरी साठी आपल्याला ७ छोट्या दगडांची गरज असते. हे दगड चापटे किंवा ओबडधोबड असले तरी चालतील. दगड ओबडधोबड असतील तर आणखी मज्जा येईल.

एक चेंडू लागेल, हा चेंडू एकमेकांना मारावा लागतो, त्यामुळे सौम्य चेंडू घ्यावा. लगोरी पासून १५ ते २० फूट अंतरावर चेंडू मारण्यासाठी रेष आखावी.

या साठी आपल्याला दोन संघांची गरज असते. प्रत्येक संघामध्ये कमीत कमी ३ आणि जास्तीत जास्त १० गडी असू शकतात.


कबड्डी खेळाची माहिती
Advertisements

लगोरी खेळाचे नियम

Lagori Information In Marathi

आपल्याला ७ दगड एकमेकांवर रचून त्यांची माळी तयार करावी लागेल. या माळीलाच लगोरी असे म्हणतात.

दोन संघापैकी पहिल्या संघातील गडी चेंडू मारून हि लगोरी पाडणार आणि ती परत उभी करण्यासाठी प्रयत्न करणार. दुसरा संघ हा पहिल्या संघाला लगोरी उभी करण्यापासून रोखणार.

हे करत असतांना दुसरा संघ हा चेंडू मारून पहिल्या संघातील गड्यांना बाद करेल.

जर कोणताही गडी बाद न होता लगोरी उभी राहिली तर त्या संघातील गडी आपला एक पाय लगोरीवर ठेऊन लगोरी असे ओरडणार. आणि याप्रमाणे पहिला संघ विजयी होईल.

MAHARASHTRA LAGORI GAME | Sport Khelo
लगोरी खेळ
Advertisements

जर पहिल्या संघातील कुणी एक गडी बाद झाला तर दुसरा संघ चेंडू मारून लगोरी पडणार. आणि खळे पुन्हा सुरु होईल.

लगोरी पाडल्यानंतर गडी हे संपूर्ण मैदानात कुठेही पळू शकतात. आणि विरुद्ध संघातील गडी त्यांना बाद करण्यासाठी धावपळ करतील. असे अत्यंत साधे आणि सोपे नियम आहेत.


बुद्धिबळ खेळाची माहिती

वेळ आणि गुण

Lagori Information In Marathi

लगोरीच्या सामन्यात प्रत्येक डावास ८ मिनिटे वेळ असतो. प्रत्येक बाजूचे दोन डाव खेळवले जातात. खेणा पक्षास लगोरी पाडण्याबद्दल प्रत्येक वेळी २५ गुण मिळतात. लगोरी रचण्याबद्दल प्रत्येक लगोरीस ५ गुण असतात. मारणार्‍या पक्षास गड मारण्याबद्दल प्रत्येक गडयास गुण मिळतात.

८ मिनिटांच्या आंत विरुद्ध बाजूचे सर्व गडी मारून डाव पुरा केल्यास राहिलेल्या प्रत्येक मिनिटास ५ गुण मिळतात.

या नियमाचे उल्लंघन केल्यास प्रत्येक नियघनाबद्दल ५ गुण कमी करतात. सामान्यासाठी क पंच व क हिशेबनीस असतो. पंच डाव चालू असताना गडी मेद्दल किंवा निमांचे उघन झालचा व इतर तक्रारींचा निकाल देतात.


भालाफेक खेळाची महिती

लगोरी खेळापासून फायदे

Lagori Information In Marathi

  • शारीरिक व्यायाम व धावण्याची सवय होते.
  • संघ कार्य शिकायला मिळते.
  • चतुराई आणि चपळता शिकायला मिळते.
  • नेतृत्व गुण अंगीकृत होतो.

Lagori Information In Marathi


Lagori Information In Marathi

प्रश्न

प्रश्न : लगोरी खेळामध्ये किती गडयांची आवश्यकता असते ?

उत्तर: लगोरी साठी आपल्याला दोन संघांची गरज असते. यातील प्रयेक संघात ४ ते १० गडी असू शकतात. असे एकूण ८ ते २० गडी या खेळामध्ये सहभागी होऊ शकतात.

प्रश्न: लगोरी खेळाची इंग्रजी नाव काय आहे?

उत्तर: सेव्हन स्टोन गेम (Seven Stone Game).

प्रश्न: लगोरी खेळाला हिंदीमध्ये काय म्हणतात?

उत्तर: लगोरी किंवा पिठठु.

प्रश्न: लगोरी मध्ये किती दगड असतात?

उत्तर: ७.

प्रश्न: लगोरी खेळ संपूर्ण देशात खेळाला जातो का?

उत्तर: होय. लगोरी हा खेळ संपून देशभर खेळाला जातो. काही ठिकाणी या खेळाला वेगवेगळी नावे दिलेली आहेत.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment