Javelin throw Information In Marathi “भालाफेक (Javelin throw) मध्ये नीरज चोप्राने भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले”
- भाला फेक (Javelin throw Information In Marathi) मध्ये नीरज चोप्रा याने शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून भारतासाठी ही ऑलिम्पिक संस्मरणीय बनवली.
- टोकियो ऑलिम्पिक: ८७.५८ मी. थ्रोसह नीरज चोप्राने शनिवारी पुरुष भालाफेल मध्ये सुवर्ण जिंकले. २३ वर्षीय ट्रॅक अँड फील्डमध्ये ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा स्वातंत्र्यानंतर पहिला भारतीय खेळाडू बनला.
- नीरज चोप्राने हे पदक मिल्खा सिंगला समर्पित केले.
इतिहास । History
Javelin throw Information In Marathi
- स्वीडनचा एरिक लेमिंग याने १८९९ मध्ये पहिले जगातील सर्वोत्तम (४९.३२ मी) भाला फेकला होता.
- लेमिंग ने १९०६ पुरुषांची भालाफेक ऑलिम्पिक इंटरकॅलेटेड खेळामध्ये ९ मी जास्त आंतर ठेऊन विजय मिळवला होता त्यामध्ये त्याने स्वत: चा विश्वविक्रम मोडला होता.
- १९ व्या शतकाच्या शेवटी आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, बहुतेक भालाफेक स्पर्धा दोन हातने खेळल्या जात होत्या. ऑलिम्पिकमध्ये दोन्ही हातांची स्पर्धा 1912 मध्ये एकदाच आयोजित करण्यात आली होती.
- दुसरा सुरवातीचा भालाफेकचा प्रकार म्हणजे फ्रीस्टाईल भालाफेक जो १९०८ च्या ऑलिम्पिकमध्ये आयोजित करण्यात आला.
- १९०९ मध्ये फिनलँडमध्ये पहिल्यांदा भालाफेक मध्ये महिलांच्या गुणांची नोंद झाली. १९२० च्या दशकात महिलांसाठी हलका, लहान भाला वापरण्यात आला. १९३२ मध्ये ऑलिम्पिक कार्यक्रमात महिलांची भालाफेक जोडली गेली; अमेरिकेचा मिल्ड्रेड “बेबे” डिड्रिकसन पहिला महिला चॅम्पियन बनली.
वाचा । पिंकी जांगरा माहिती
जागतिक अंडर-२३ कुस्ती चॅम्पियनशिप नोव्हेबंर २०२१
नियम | Rules
- भाला फेकीच्या मार्गाची लांबी किमान ३ मीटर तर रूंदी ४ मीटर असते.
- भाला फेकताना नेहमी २९° कोणाच्या सेक्टरमध्येच फेकावा.
- भाल्याची लांबी पुरुषांसाठी २६० सें. मी. तर स्त्रियांसाठी २२० सें. मी. ते २३० सें. मी. असावी.
- भाल्याला जिथे पकड असते, तिथे भाला धरणे महत्वाचे असते.
- फेकलेला भाला(टोक)जमिनीस लागला पाहिजे.
- भाला जमिनीस टेके पर्यंत स्पर्धकाने रनवे सोडता कामा नये.
- भाल्याचे वजन पुरुषांसाठी ८०० ग्रॅम व स्त्रियांसाठी ६०० ग्रॅम हवे.
- भाला फेकीसाठी अमेरिकन पद्धत, फिनिश पद्धत व हंगेरीयन पद्धत वापरतात.
- यात भाल्याची पकड आणि भाला फेकणे याला फार महत्व आहे.
- भाला फेक करताना एकाच जागी उभे राहून भाला न फेकता धावत जाऊन फेकतात. त्यामुळे भाला वेगाने जास्त अंतरावर जातो.
- भालाफेक पूर्ण झाल्यानंतर ज्या ठिकाणी भाला पडला असेल तिथून खेळाडूने स्वतः भाला उचलून आणायचा असतो.
वाचा । सानिया मिर्झा – २००६ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित
जागतिक क्रमवारी | World Ranking
पुरुषांची भालाफेक
- जोहान्स व्हेटर
- नीरज चोप्रा
- मार्सिन क्रुकोव्स्की
- जेकब वडलेज
- ज्युलियन वेबर
- केशोर्न वालकॉट
- अँड्रियन
- वेट्झस्लाव वेस्ले
- अँडरसन पीटर्स
- अलियाकसे काटकवेट्स
महिलांची भालाफेक
- क्रिस्टीन हुसॉन्ग
- मारिया अँड्रेझिक
- केल्सी-ली बार्बर
- हुई लुई
- मॅगी मेलोन
- लिव्हटा जेसिनायटी
- कॅथरीन मिशेल
- निकोला
- बार्बोरा
T20 वर्ल्डकप 2021 पॉइंट्स टेबल इन मराठी
वयोगटानुसार भाल्याच्या वजनाचे नियम
पुरुष | महिला | |
वयोगट | वजन | वजन |
१३ वर्षाखालील | ४०० ग्रॅम | ४०० ग्रॅम |
१५ वर्षाखालील | ६०० ग्रॅम | ५०० ग्रॅम |
१८ वर्षाखालील | ७०० ग्रॅम | ५०० ग्रॅम |
२० वर्षाखालील (कनिष्ट) | ८०० ग्रॅम | ६०० ग्रॅम |
ज्येष्ठ | ८०० ग्रॅम | ६०० ग्रॅम |
३५ ते ४९ | ८०० ग्रॅम | ६०० ग्रॅम |
५० ते ७४ (महिलांसाठी) | ५०० ग्रॅम | |
५० ते ५९ | ७०० ग्रॅम | |
६० ते ६९ | ६०० ग्रॅम | |
७० ते ७९ | ५०० ग्रॅम | |
७५ पेक्षा जास्त (महिलांसाठी) | ४०० ग्रॅम | |
८० पेक्षा जास्त | ४०० ग्रॅम |
वाचा । १० महान ऑलिम्पिक खेळाडू
भाला । Javelin
- भाला तीन भागांचा बनवलेला असतो.
- भाल्याचा फाळ वा टोक, भाल्याची दांडी आणि भाल्याची मूठ.
- भाल्याची दांडी लाकडी बांबूची वा धातूपासून बनवलेली असते.
- दांडी हातात पकडण्यासाठी दांडीच्या मध्यावर दोरी गुंडाळून पकड तयार केलेली असते.
- भाल्याचे टोक धातूचे व निमुळते बनवलेले असते. हे धातूचे टोक २५ ते ३३ सेंमी., दोरीची मूठ १५ ते १६ सेंमी. असते.
- भाल्याची एकूण लांबी २·६० ते २·७० मी. असते.
- भाल्याची दांडी मध्यभागी जाड व तेथून दोन्ही टोकांकडे निमुळती होत जाते.
- भालाफेक (Javelin throw Information In Marathi) करण्यासाठी धावमार्ग किमान ३० मी. ते कमाल ३६·५ मी. लांबीचा असावा.
- ४ मी. अंतरावर २ समांतर रेषा (५ सेंमी. जाडीच्या) आखाव्यात.
- नंतर ८ मी. (२६’-३’’) त्रिज्या घेऊन दोन समांतर टोकांना पोचेल, असा कंस आखावा.
- ही कड धातूची वा लाकडाची करावी आणि तिची जाडी ७ सेंमी. ठेवून ती पांढर्यात रंगाने रंगवून जमिनीच्या पातळीत पक्की करावी.
भाला पकडण्याच्या दोन पद्धती
१) अमेरिकन पकड
- अमेरिकन पकडीत अंगठा व तर्जनी यांच्या विळख्यात भाला धरला जातो.
२) फिनिश पकड
- फिनिश पकडीत मध्यभागी तोल रहावा, म्हणून दोरीने गुंडाळलेल्या जागेचा खालचा भाग हा अंगठा व मधले बोट यांनी मजबूत पकडून, तिरकस तळव्याच्या पोकळीत भाला धरला जातो
भारतीय भालाफेक खेळाडू
पुरुष
- सुमित अंतिल
- राजेश बिंड
- जगदीश बिश्नोई
- संदीप चौधरी
- नीरज चोप्रा
- देवेंद्र झाझारिया
- दविंदर सिंग कांग
- विपिन कसाना
- जहांगीर खान (क्रिकेटपटू)
- काशिनाथ नाईक
- नरेंद्र रणबीर
- रिंकू (खेळाडू)
- रविंदर सिंग खैरा
- अनिल सिंग (भाला फेकणारा)
- गुरतेज सिंग (अॅथलीट)
- परसा सिंग
- शिवपाल सिंग
- अजितसिंग यादव
महिला
- एलिझाबेथ डेव्हनपोर्ट
- गुरमीत कौर
- दिपा मलिक
- अन्नू राणी
- रझिया शेख
वाचा। हर्षल पटेल माहिती
धन्यवाद निखिल आसेच प्रेम राहू द्या