बुद्धिबळ (Chess Information In Marathi) हा दोन खेळाडूंसाठी बोर्ड गेम आहे. हा खेळ चौरस बोर्डवर खेळला जातो. जो ६४ लहान चौरसांनी बनलेले असते.
यात १६ काळ्या आणि १६ पांढऱ्या सोंगट्या असतात. हा खेळ दोन खेळाडूंत खेळला जातो. यापैकी एकाला काळ्या तर दुसऱ्याला पांढऱ्या सोंगट्या दिल्या जातात. १६ सोंगट्यांमध्ये ८ प्यादे, २ हत्ती, २ उंट, २ घोडे, १ राजा आणि १ वजीर अशा विविध प्रकारच्या सोंगट्या असतात.
अनुक्रमणिका
इतिहास | History
उपलब्ध माहितीनुसार भारतात ६ व्या शतकापासून बुद्धिबळ खेळले जायचे. बुद्धिबळाचा इतिहास तसा खूप जुना आहे. त्यामुळे हा खेळ नेमका केव्हा सुरु झाला याचा अंदाज बांधणे थोडे कठीणच आहे. हा खेळात सुमारे १४७० ते १४९५ दरम्यान मोठ्या प्रमाणात बदल झाला.
नियम | Rules
बुद्धिबळाचे नियम जागतिक बुद्धिबळ महासंघाद्वारे नियंत्रित केले जातात , जे FIDE म्हणजे Fédération Internationale des Échecs ने ओळखले जातात.
हा खेळ दोन खेळाडूंमध्ये खेळल्या जातो. समोरील खेळाडूच्या राजाला मात देणे हा प्रत्येक खेळाडूचा हेतू असतो. राजाच्या बचावासाठी उर्वरित सोंगट्यांचा उपयोग केला जातो. प्रत्येक सोंगटीची विशिष्ट अशी चाल असते.
राजा (King)
जो पर्यंत राजाला संकट येत नाही तो पर्यंत राजा चालू शकत नाही. संकट आल्यास तो कुठल्याही दिशेला १ घर चाल करू शकतो.
वजीर / राणी (Queen) :
राणी / वजीर हे कितीही घरांची आडवी, उभी आणि तिरपी चाल चालू शकतात.
प्यादे (Pawn)
प्यादा हा १ घर सरळ चालते पण जेव्हा प्याद्याच्या तिरप्या बाजूला समोरील खेळाडूची सोंगटी येते, तेव्हा ते तिरपे चालू शकते आणि त्याच्यावर मात करु शकतात.
हत्ती (Rook)
हत्ती हा फक्त आडवी आणि उभी चाल चालू शकते. मग ही चाल कितीही घरांची असू शकते.
उंट (Bishop)
उंट कितीही घरांपर्यंत तिरपी चाल चालु शकतो.
घोडा (Knight)
घोडा हा कुठल्याही दिशेला २ घर सरळ आणि १ घर आडवी चाल करू शकतो.
भारतीय बुद्धिबळ खेळाडू । Indian Chess Players
- FIDE आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ (Chess Information In Marathi) फेडरेशन नुसार जानेवारी 2021 पर्यंत भारतीय बुद्धिबळ खेळाडू मध्ये ६९ ग्रॅंंडमास्टर्स , १२४ आंतरराष्ट्रीय मास्टर्स , २० महिला ग्रॅंंडमास्टर्स , ४२ महिला आंतरराष्ट्रीय मास्टर्स आणि ३३०२८ एकूण रेटेड खेळाडू आहेत.
- जानेवारी २०२१ पर्यंत, शीर्ष १० भारतीय बुद्धिबळ खेळाडूंचे सरासरी रेटिंग २६७० होते, जे रशिया, अमेरिका आणि चीनच्या मागे जगातील चौथ्या क्रमांकावर आहे.
- पहिल्या १० सक्रिय महिला भारतीय खेळाडूंचे सरासरी रेटिंग २४०५ होते, जे चीन आणि रशियाच्या मागे जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अव्वल पुरुष खेळाडू । (Male Players)
क्र. | नाव | राज्य | जन्म |
१ | विश्वनाथन आनंद | तामिळनाडू | ११ डिसेंबर १९६९ |
२ | विदित गुजराथी | महाराष्ट्र | २४ ऑक्टोबर १९९४ |
३ | पेंटाला हरिकृष्ण | आंध्र प्रदेश | १० मे १९८३ |
४ | बास्करन अधिबन | तामिळनाडू | १५ ऑगस्ट १९९२ |
५ | कृष्णन शशिकिरण | तामिळनाडू | ७ जानेवारी १९८१ |
६ | एसपी सेतुरामन | तामिळनाडू | २५ फेब्रुवारी १९९३ |
७ | चितंबरम अरविंद | तामिळनाडू | ११ सप्टेंबर १९९९ |
८ | परिमर्जन नेगी | दिल्ली | ९ फेब्रुवारी १९९३ |
९ | सूर्य शेखर गांगुली | पश्चिम बंगाल | २४ फेब्रुवारी १९८३ |
१० | निहाल सरीन | केरळा | १३ जुलै २००४ |
अव्वल महिला खेळाडू । (Female Players)
क्र. | नाव | राज्य | जन्म |
१ | कोनेरू हंपी | आंध्र प्रदेश | 31 मार्च 1987 |
२ | हरीका द्रोणावल्ली | आंध्र प्रदेश | 12 जानेवारी 1991 |
३ | वैशाली रमेशबाबू | तामिळनाडू | 21 जून 2001 |
४ | तानिया सचदेव | दिल्ली | 20 ऑगस्ट 1986 |
५ | भक्ती कुलकर्णी | गोवा | 19 मे 1992 |
६ | पद्मिनी राऊत | ओरिसा | 5 जानेवारी 1994 |
७ | पीव्ही नंदीधा | तामिळनाडू | 10 एप्रिल 1996 |
८ | मेरी अॅड गोम्स | पश्चिम बंगाल | 19 सप्टेंबर 1989 |
९ | सौम्या स्वामीनाथन | महाराष्ट्र | 21 मार्च 1989 |
१० | सुब्बारामन विजयालक्ष्मी | तामिळनाडू | 25 मार्च 1979 |
बुद्धिबळ खेळण्याचे फायदे
- बुद्धिबळ मध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद आहे.
- एकाग्रता वाढते.
- तार्तिक दृष्टिकोन वाढतो आणि आपल्या विचारांमध्ये आणि निर्णयांमध्ये स्पष्टता येते.
- खिलाडू वृत्ती निर्माण होते.
- कठीण परिस्थितीमध्ये सर्वोत्तम निर्णय घेण्याचे कौशल्य.
- मेंदूचा व्यायाम होतो.
- आत्मविश्वास निर्माण होतो
- ताण-तणावामध्ये शांत राहण्यास मदत.
- स्किझोफ्रेनिया या रोगावर उपचार होण्यास मदत.
- शैक्षणिक क्षेत्र आणि नोकरी मध्ये सुद्धा फायदा.