भारताचा न्यूझीलंड दौरा २०२२ : अॅडलेड: नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचे कार्यकारी मुख्य प्रशिक्षक असणार आहेत कारण राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफला टी-२० विश्वचषक २०२२ मधून संघ बाहेर पडल्यानंतर ब्रेक देण्यात आला आहे.
भारताचा न्यूझीलंड दौरा २०२२
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. इंग्लंडकडून मानहानीकारक पराभव स्विकाराला लागल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. १८ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहेत.
कर्णधार रोहित शर्मा , स्टार फलंदाज विराट कोहली , सलामीवीर केएल राहुल आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन
या वरिष्ठ खेळाडूंना या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.
इंग्लंडकडून १० विकेटने पराभव स्विकारावा लागल्यानंतर सध्या टीम इंडियावर चहुबाजूंनी टीका होत आहे. त्यातच सिनीअर खेळाडूंना विश्रांती देण्याची मागणी होत असताना न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
Source – BCCI
न्यूझीलंड दौऱ्यात टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ –
हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, दिपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उप-कर्णधार आणि विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक
वन-डे मालिकेसाठी भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उप-कर्णधार आणि विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक