आयपीएल इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर : ख्रिस गेलच्या नावावर इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळण्याचा विक्रम आहे, त्याने २३ एप्रिल २०१३ रोजी बेंगळुरू येथे पुणे वॉरियर्स विरुद्ध ६६ चेंडूत १७५* धावा केल्या.
जी आयपीएल इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्या खेळाडूंना पहा.
आयपीएल मध्ये एखाद्या खेळाडूने शतक केले कि सामना जिंकणेही सोपे जाते. इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वाधिक वैयक्तिक धावा केलेल्या १० फलंदाजांची यादी आपण पाहणार आहोत. (top 10 highest individual scores in IPL history)
आयपीएल इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर खेळाडू
नं. | खेळाडू | विरुद्ध | धावा |
---|---|---|---|
०१ | ख्रिस गेल (RCB) | पुणे वॉरियर्स | १७५* |
०२ | ब्रेंडन मॅक्युलम (KKR) | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | १५८* |
०३ | एबी डिव्हिलियर्स (आरसीबी) | मुंबई इंडियन्स | १३३* |
०४ | एबी डिव्हिलियर्स (आरसीबी) | गुजरात लायन्स | १२९* |
०५ | ख्रिस गेल (RCB) | दिल्ली डेअरडेव्हिल्स | १२८* |
०६ | ऋषभ पंत (DDD) | सनरायझर्स हैदराबाद | १२८* |
०७ | मुरली विजय (CSK) | राजस्थान रॉयल्स | १२७ |
०८ | डेव्हिड वॉर्नर (SRH) | कोलकाता नाईट रायडर्स | १२६ |
०९ | वीरेंद्र सेहवाग (KXIP) | चेन्नई सुपर किंग्ज | १२२ |
१० | पॉल व्हॅल्थाटी (KXIP) | चेन्नई सुपर किंग्ज | १२०* |
आयपीएल इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारे फलंदाज
- ख्रिस गेल (Chris Gayle) : १७५ *
वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) आयपीएल इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर आहे .- गेलने २०१३ साली बेंगळुरू येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना पुणे वॉरिअर्सविरुद्ध अवघ्या ६६ चेंडूत १३ चौकार आणि १७ षटकारांच्या मदतीने तब्बल १७५ धावांची नाबाद खेळी केली होती.
निर्मल तन्वर विकी, वय, उंची, इंस्टाग्राम, व्हॉलीबॉल टीम कॅप्टन
- ब्रेंडन मॅक्यूलम (Brendon McCullum) : १५८ *
२००८ साली आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मॅक्यूलमने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध त्याने केवळ ७३ चेंडूत १५८ धावांची नाबाद खेळी केली होती.- या सामन्यात त्याने १० चौकार आणि १३ षटकारांच्या जोरावर १५८ धावा केल्या. या सामन्यात मॅक्यूलमला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
प्रियांका खेडकर व्हॉलीबॉल खेळाडू
- एबी डिविलियर्स (AB De Villiers) : १३३ *
एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध ५९ चेंडूत १३३ धावांची नाबाद वैयक्तिक खेळी केली होती.- या सामन्यात त्याने १९ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर १३३ धावा केल्या होत्या.
- केएल राहुल (KL Rahul) : १३२*
केएल राहुलने (KL Rahul) आरसीबीविरूद्ध केवळ ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या.- या सामन्यात राहुलने १४ चौकार आणि ७ षटकार मारून १३२ धावा पूर्ण केल्या होत्या.
- एबी डिविलियर्स (AB De Villiers) : १२९ *
एबी डिविलियर्सने २०१६ मध्ये विराट कोहलीसोबत (Virat Kohli) भागीदारी करत आपल्या मागील भागीदारीचा विक्रम मोडला.- या दोघांनीही गुजरात लायन्स संघाविरुद्ध आयपीएल इतिहासातील २२९ धावांची सर्वोच्च भागीदारी रचली. यादरम्यान डिविलियर्सने केवळ ५२ चेंडूत १० चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने १२९ नाबाद धावा केल्या. याव्यतिरिक्त विराटनेही १०९ धावांची खेळी केली होती.
जर्लिन अनिकाची उंची, वय, बॉयफ्रेंड, कुटुंब, चरित्र आणि बरेच काही
- ख्रिस गेल (Chris Gayle) : १२८ *
या यादीत पुन्हा एकदा ख्रिस गेल चा समावेश आहे. T20 क्रिकेट मधील विस्फोटक फलंदाज म्हणून ख्रिस गेलला ओळखले जाते.- आयपीएल इतिहासात सर्वोधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये गेल चा समावेश आहे. २०१२ साली दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध खेळताना त्याने ६२ चेंडूंच्या मदतीने तब्बल १२८ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यात ७ चौकार आणि १३ षटकारांचा समावेश आहे.
आयपीएल इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर
- ऋषभ पंत (Rishabh Pant) : १२८ *
- ऋषभ पंतने (Rishabh Pant) आयपीएलमध्ये पहिले शतक सनरायझर्स हैदराबादविरुद्ध केले. त्याने ६३ चेंडूंत नाबाद १२8 धावा केल्या. त्यात त्याच्या १५ चौकार आणि ७ सिक्स चा समावेश आहे.
मीराबाई चानूची उंची, वजन, वय, पती, कुटुंब, चरित्र आणि बरेच काही
- मुरली विजय (Murali Vijay ) : १२७
- राजस्थान रॉयल्सविरूद्ध सीएसकेचा सलामीवीर मुरली विजयने केवळ ५६ चेंडूत १२७ धावा केल्या. यात ८ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता.
- डेव्हिड वॉर्नर (David Warner) : १२६
सनरायझर्स हैदराबादसाठी वॉर्नरने केवळ ५९ चेंडूंत १२६ धावा केल्या होती. त्यात त्याच्या 10 चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे.
आयपीएल इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर
- विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) : १२२
विरेंद्र सेहवागने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात 58 चेंडूत 122 धावा केल्या होत्या. त्यात 12 चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता.