निर्मल तन्वर विकी, वय, उंची, इंस्टाग्राम, व्हॉलीबॉल टीम कॅप्टन | Nirmal Tanwar Biography In Marathi

निर्मल तंवरचा (Nirmal Tanwar Biography In Marathi) जन्म ५ सप्टेंबर १९९६ रोजी असन कलान, पानिपत भारत येथे झाला, ती एक भारतीय व्हॉलीबॉल खेळाडू आहे.

आताच झालेल्या AVC चॅलेंज कप २०२२ मध्ये भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाने रौप्य पदक मिळवले त्या स्पर्धेमध्ये निर्मल कर्णधार होती.

निर्मल तन्वर विकी, वय, उंची, इंस्टाग्राम, व्हॉलीबॉल टीम कॅप्टन | Nirmal Tanwar Biography In Marathi
Nirmal Tanwar
Advertisements

वैयक्तिक माहिती । Nirmal Tanwar Personal Information

नावनिर्मल तंवर
जन्मतारिख०५/०९/१९९६
वय (२०२२ पर्यंत)२५ वर्षे
वजन७६ किलो
उंची१७९ सेमी
जन्मस्थानअसन कलान, पानिपत
कुटुंबवडिलांचे नाव – मदन काल
आईचे नाव – बाला देवी
भावाचे नाव – अंकित तन्वर
बहिणीचे नाव – कोमल
शाळेचे नावG.S.S असन कलान
कॉलेजचे नावS.D कॉलेज पानिपत
मुळ गावVPO असन कलान, पानिपत, हरियाणा १३२१०५
शिक्षणबी. ए. फायनल
पुरस्कार वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट आक्रमण करणारा राष्ट्रीय ज्युनियर , विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुरस्कार मिळाला
मोठी कामगिरी२ वेळा आशियाई खेळांमध्ये भाग – २०१४ आणि २०१८
२ वेळा दक्षिण आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक – २०१६, २०१९(कर्णधार)
AVC चॅलेंज कप २०२२ मध्ये रौप्य पदक
व्हॉलीबॉल स्थिती काउंटर अटॅकर
क्लबअसन कलान (रेल्वे)
विवाह स्थितीअविवाहित
कोच नावपानिपतमधून – जगदीश पीटीआय
महाराष्ट्रमधून – वैशाली फडत्रे
Nirmal Tanwar Biography In Marathi
Advertisements

१० प्रसिद्ध भारतीय बास्केटबॉल खेळाडू २०२२
Advertisements

सुरवातीचे दिवस। Nirmal Tanwar Early Days

११ वर्ष वय आसताना म्हणजे २००७ मध्ये निर्मलने शाळेत फक्त एक मनोरंजक खेळ म्हणून व्हॉलीबॉल खेळायला सुरवात केली होती.

पुढे तिला या खेळाची आवड निर्माण झाली, तिने संध्याकाळची प्रक्टीस सुर केली व तिचा खेळ सुधारत गेला.

ती बोलली की

” लग्न असो किंवा कोणता कार्यक्रम असो मी प्रक्टीस कधीच चुकवली नाही, रोज प्रक्टीस चालु ठेवली “

त्यांना शिकवण्यासाठी कोणते स्पेशल कोच नाही मिळाले ती जे पण शिकली ते त्याच्या हॅंडबॉल कोच जगदीश पीटीआय यांच्या कडून ती शिकली, असे तिने सांगितले.


पूजा गहलोत वय, वजन, पती, कुटुंब, चरित्र आणि बरेच काही

कुटुंब । Nirmal Tanwar Family

निर्मल तंवरचा (Nirmal Tanwar Biography In Marathi) जन्म ५ सप्टेंबर १९९६ रोजी असन कलान, पानिपत भारत येथे झाला.

Nirmal Tanwar Family |  निर्मल तिच्या कुटुंबासोबत । Nirmal Tanwar Biography In Marathi
निर्मल तिच्या कुटुंबासोबत
Advertisements

तिचे वडील मदन काल यांचे २०२१ साली दु:खद निधन झाले. तिची आई बाला देवी या हाऊस वाईफ आहेत. तिची बहीण विवाहीत आहे आणि भाऊ अंकित तन्वर हा बिझनेस करतो.


आपल्या Sport Khelo चे नवीन युट्युब चॅनेल

करिअर । Nirmal Tanwar Career

  • २००७ मध्ये निर्मलने व्हॉलीबॉल खेळायला सुरवात केली. २००८ साली शाळे तर्फ़े राष्ट्रीय व्हॉलीबॉल U-१४ खेळात तिला ब्रॉन्झ पदक मिळाले होते.
  • २०१४ साली ती पहिल्यांदा ज्युनिअर भारतीय व्हॉलीबॉल संघाची कर्णधार बनली.
  • २०१४ साली तीच्या राष्ट्रीय खेळातील पदक व प्रमाणपत्र विजयामुळे तीला रेल्वे मध्ये Head TT पदावर नोकरी लागली.
  • २०१९ साली सिनिअर भारतीय व्हॉलीबॉल संघाची कर्णधार बनत तीने दक्षिण आशियाई खेळात सुर्वण पदक मिळवले.
  • २०१९ साला पासून AVC चॅलेंज कप २०२२ पर्यंत ती सिनिअर भारतीय व्हॉलीबॉल संघाची कर्णधार आहे.
  • नुकतेच भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाने AVC चॅलेंज कप २०२२ मध्ये रौप्य पदक मिळवले.
  • इंटर रॅली चॅम्पियन २०२१ मध्ये तीने पदक मिळावले.
  • साऊथ अ‍ॅशिअन गेम्स २०२१ मध्ये सुर्वणपदक विजेती.
  • २०२२ मध्ये भीमावरम आंध्र प्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय स्पर्धेत तिला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
  • ७० वी वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धात भारतीय संघाला विजेतपद मिळाले.
  • ३४ व्या फेडरेशन कप व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपमध्ये सर्वोत्कृष्ट अ‍टॅकर म्हणून बक्षीस विजेती.
  • ३५वी फेडरेशन कप चॅम्पियनशिप मध्ये सर्वोत्कृष्ट अ‍टॅकर म्हणून बक्षीस विजेती.
  • ८ व्या पंतप्रधान चषक महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत ट्रॉफी व पदक विजेती.
  • ३ऱ्या AVC महिला चॅलेंज कप २०२२ मध्ये भारतीय संघ निर्मलच्या कर्णधार पदाखाली रौप्य पदक जिंकले.

पुरस्कार व पदक । Nirmal Tanwar Awards & Medals

  • २००८ – शाळे तर्फ़े राष्ट्रीय व्हॉलीबॉल U-१४ खेळात ब्रॉन्झ पदक
  • २०१९ – सिनिअर भारतीय व्हॉलीबॉल संघाची कर्णधार बनत दक्षिण आशियाई खेळात सुर्वण पदक
  • २०२० – साऊथ नॅशनल गेम्स मध्ये सुर्वणपदक
  • २०२१ – इंटर रॅली चॅम्पियन २०२१ मध्ये पदक
    • साऊथ अ‍ॅशिअन गेम्स २०२१ मध्ये सुर्वणपदक
  • २०२२ – भीमावरम आंध्र प्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार

कोण आहे जेरेमी लालरिनुंगा वेटलिफ्टर?


उपलब्धी | Nirmal Tanwar Achievements

  • २०१२ मध्ये बँकॉक येथे दक्षिण पूर्व आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप
  • २०१३ मध्ये थायलंड येथे सीनियर एशियन चॅम्पियनशिप
    • मध्ये चीन येथे जागतिक अजिंक्यपद पात्रता फेरी
    • मध्ये गोवा येथे लुसोफोनिया गेम्स (सुवर्ण)
  • २०१४ मध्ये तैवान येथे ज्युनियर आशियाई चॅम्पियनशिप (कर्णधार)
  • २०१५ मध्ये फिलीपिन्स येथे पहिली आशियाई अंडर-२३ व्हॉलीबॉल स्पर्धा
    • चीन येथे वरिष्ठ आशियाई चॅम्पियनशिप
  • २०१६ मध्ये गुवाहाटी येथे SAF गेम्स मध्ये सुवर्ण
  • २०१९ मध्ये Seoul येथे सीनियर एशियन चॅम्पियनशिप
    • मध्ये काठमांडू येथे मध्ये SAF गेम्स (कॅप्टन) – सुवर्ण
  • २०१४ इंचॉन आणि २०१८ जकार्ता आशियाई खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

व्हॉलीबॉलमध्ये भारताचे कर्णधार इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग

  • २०१२ मध्ये बँकॉक येथे दक्षिण पूर्व आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप
  • २०१३ मध्ये थायलंड येथे सीनियर एशियन चॅम्पियनशि
    • मध्ये चीन येथे जागतिक अजिंक्यपद पात्रता फेरी
    • मध्ये गोवा येथे लुसोफोनिया गेम्स (सुवर्ण)
  • २०१४ मध्ये तैवान येथे ओ ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप (कॅप्टन)
  • २०१५ मध्ये फिलीपिन्स येथे पहिली आशियाई अंडर-२३ व्हॉलीबॉल स्पर्धा


Nirmal Tanwar Infromation In Marathi

सोशल मिडीया आयडी

इंस्टाग्राम अकाउंट | Nirmal Tanwar Instagram Id

Nirmal Tanwar Biography In Marathi


प्रश्न | FAQ

प्रश्न: तुम्हाला व्हॉलीबॉल खेळण्याची आवड कशी निर्माण झाली?

उत्तर: २००७ मध्ये शाळेत फक्त एक मनोरंजक खेळ म्हणून व्हॉलीबॉल खेळायला सुरवात केली. शाळेत खेळ खेळण्याची आवड वाढत गेली. तेव्हा पीटीआय जगदीश संराने संघ तयार केला आणि संध्याकाळी सरावासाठी शाळेत जाऊ लागले.

प्रश्न: भारतीय संघाचा कर्णधार झाल्यावर तुम्हाला कसे वाटते?

उत्तर : गावच्या शाळेतून खेळायला सुरुवात केली. आई-वडील आणि गुरूंच्या आशीर्वादाने मला या टप्प्यावर पोहोचल्याचा अभिमान वाटतो. खेळाला पुढे नेण्यासाठी मला मिळालेला पाठिंबा मी कधीही विसरणार नाही.

प्रश्न : इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला?

उत्तरः पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मला त्यांच्या विश्वासाप्रमाणे जगायचे होते. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी रात्रंदिवस संघर्ष केला.

प्रश्न : तुम्ही रेल्वेला सेवा देत आहात, सरावासाठी किती वेळ उपलब्ध होतो?

उत्तरः रेल्वेच्या बाजूने खेळण्यासाठी पूर्ण वेळ मिळतो. मला ड्युटीवर जावे लागत नाही. मी दररोज सकाळी ६.३० ते ९.३० आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत सराव करते.

टीप – या अर्टीकल मधली संपुर्ण माहिती निर्मल तन्वर यांच्या सोबत चर्चा करुन लिहण्यात आलेली आहे. आजुन माहिती वेळोवेळी आपडेट होत राहील. या संपुर्ण माहिती बद्दल आम्ही निर्मल तन्वर यांचे खुप खुप आभारी आहोत.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment