महिला विश्वचषक फुटबाॅल : स्पेन,स्वीडन उपांत्य फेरीत दाखल

महिला विश्वचषक फुटबाॅल

सलमा पॅरालुएलो हिने अतिरिक्त वेळेत केलेल्या जबरदस्त गोलच्या जोरावर स्पेनने गत उपविजेत्या नेदरलँडला २-१ असे हारवले व महिला विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, स्वीडनने जपानला २-१ असे हारवले.

महिला विश्वचषक फुटबाॅल
Advertisements

युरोपातील दोन बलाढ्य संघांमधील सामन्यात पॅरालुएलोने १११ व्या मिनिटाला विजयी गोल केला. नेदरलँड्सचा चार वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये अंतिम लढतीत अमेरिकेविरुद्ध पराभव झाला होता. FIFA Women’s World Cup 2023 News : ब्राझीलने पनामाला ४-० ने हरवले, इटली विरुद्ध अर्जेंटिनाचा पराभव

मारियोना कालडेंटीने केलेल्या ८१ व्या मिनिटाला गोल मुळे स्पेनला १-० असे आघाडीवर नेले. अखेरच्या दहा मिनिटांत नेदरलँडची बचावपटू स्टेफानी वान डर ग्राग्टने संघाला बरोबरी साधून दिली. सामन्या दरम्यान हाताला चेंडू लागल्याने स्पेनला ८१ व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली त्यावर मारियोनाने गोल केला. त्यानंतर पॅरालुएलोने विजयी गोल केला. 

अलमांडा इलेस्टेडने ३२व्या मिनिटाला गोल करत स्वीडनला आघाडीवर नेले. यानंतर फिलिपा एंजेल्डालने ५१व्या मिनिटाला पेनल्टी किकवर गोल करत संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. जपानकडून होनाका हयाशीने ८७व्या मिनिटाला गोल केला.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment