विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला, कोणता ते जाणून घ्या

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

आशिया चषक २०२३ मध्ये काल झालेल्या पाकिस्तानविरुद्ध च्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावताना अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
Advertisements

विराट कोहली आणि केएल राहुल या जोडीने ३-या विकेटसाठी २३३ धावा जोडल्या, ज्याने अनेक विक्रम मोडले.

कोहली आणि राहुल यांच्यातील भागीदारी ही आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासातील कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे.

२३३ धावा ही एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी पाकिस्तान विरुद्धची सर्वोच्च भागीदारी देखील आहे, ज्याने सचिन तेंडुलकर आणि नवज्योत सिद्धू यांचा विक्रम मोडला ज्यांनी १९९६ मध्ये शारजाह येथे झालेल्या सामन्यात दुसऱ्या विकेटसाठी २३१ धावा जोडल्या.

१३,००० वनडे धावा करणारा ५वा खेळाडू

विराट कोहली खेळाच्या इतिहासात १३,०००+ वनडे धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. भारतीय फलंदाज विराट आता सचिन तेंडुलकर (१८४२६), कुमार संगकारा (१४२३४), रिकी पाँटिंग (१३७०४), सनथ जयसूर्या (१३४३०) या एलिट यादीत सामील झाला आहे.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment