आशिया कप २०२३ चे सामने कुठे पाहायचे?

आशिया कप २०२३ चे सामने कुठे पाहायचे

आशिया चषक स्पर्धा आज सुरु झाली आहे. आज पाकिस्तानच्या सामन्याने आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. 

आशिया कप २०२३ चे सामने कुठे पाहायचे
Advertisements

आशिया चषक स्पर्धेची सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. आशिया चषकातील सर्व सामन्यांचे टॉस हे दुपारी २.३० वाजता होणार आहे. दुपारी ३.०० वाजता भारतीय वेळेनुसार हे सामने सुरु होतील. पण हे सामने नेमके कोणत्या चॅनेलवर पाहायला मिळतील, याची माहिती आता घेऊया

आशिया कप २०२३ मधील सर्व संघाच्या खेळाडूंची यादी

आशिया चषकातील सामने टीव्ही आणि अ‍ॅपवरही पाहता येणार आहेत. आशिया चषकातील सर्व सामने हे स्टार स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहायला मिळणार आहेत. दुपारी २.०० वाजल्यापासून या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण Star Sports वर पाहायला मिळतील. त्याचबरोबर Disney+ Hotstar वरही हे सामने लाइव्ह फ्री मध्ये पाहायला मिळणार आहेत.

या स्पर्धेत भारताचा पहिला सामना हा पाकिस्तानबरोबर २ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे

आशिया कपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा. संजू सॅमसन (राखीव खेळाडू).

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment