रेकॉर्ड : शुबमन गिलच्या नावावर नवीन रेकॉर्ड, येथे वाचा
न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात पहिला वनडे सामना 25 नोव्हेंबर रोजी ऑकलंडच्या इडन पार्कवर खेळला गेला. यावेळी भारताचा कर्णधार शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला उत्तम सुरूवात करून दिली. यावेळी गिलने विक्रम केला आहे, तो कोणता ते पाहूया
शुबमन गिलच्या नावावर नवीन रेकॉर्ड
शुबमन गिल याने न्यूझीलंड विरुद्ध 63 चेंडूत 50 धावा केल्या. ही खेळी करताच तो भारताकडून 13 वनडे डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. या यादीत आधी नवज्योत सिंग सिद्धू होते. त्यांनी 558 धावा केल्या, दुसरीकडे गिलने 13 सामन्यांच्या 13 डावांमध्ये 57.18च्या सरासरीने 629 धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतासाठी सर्वाधिक वनडे धावा (13 डावांनंतर)
- शुभमन गिल – 629
- नवज्योत सिंग सिद्धू – 558
- शिखर धवन – 536
- श्रेयस अय्यर – 531
- केदार जाधव – 502
त्याचबरोबर गिलने 2022 मध्ये आतापर्यंत वनडे क्रिकेटचे 10 डाव खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 64(53), 43(49), 98*(98), 82*(72), 33(34), 130(97), 3(7), 28(26), 49(57) आणि 50(65) अशा धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात गिलने शिखर धवन याच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. धवनही 77 चेंडूत 13 चौकाराच्या साहाय्याने 72 धावा करत बाद झाला.
Fourth ODI half-century for Shubman Gill 🙌
— ICC (@ICC) November 25, 2022
Watch the #NZvIND ODI series LIVE on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺
📝 Scorecard: https://t.co/KsjLsSQ2eQ pic.twitter.com/9GKwgpDbjW