ऑलिंपिक खेळात भारत । India In Olympic​

India In Olympic​

ऑलिंपिक खेळात भारताचा सर्वप्रथम सहभाग सन १९०० मध्ये झाला. त्यावेळी नॉर्मन प्रितचार्ड ह्या एकमेव ॲथलिटने भारतातर्फे भाग घेतला होता ज्यामध्ये त्याने २ पदके मिळविली.

India In Olympic​
१९२० उन्हाळी ऑलिंपिक Source
Advertisements
  • देशाचा पहिला संघ १९२० मध्ये उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पाठविला गेला. भारत देशाने आजवर १८९६, १९०४, १९०८ व १९१२ सालांमधील स्पर्धा वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
  • १९२० उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील सातवी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा बेल्जियम देशाच्या अँटवर्प शहरामध्ये २० एप्रिल ते १२ सप्टेंबर दरम्यान खेळवली गेली. India In Olympic

India In Olympic​ इतिहास | History

  • आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी ऑलिंपिक मध्ये एकूण २६ पदके मिळविली आहेत, त्यापैकी सर्वात जास्त ११ पदके हॉकी मध्ये आहेत. India In Olympic
  • बऱ्याच काळापर्यंत भारतचा पुरूष हॉकी संघ ऑलिंपिक खेळात सर्वोच्च स्थानावर होता.
  • १९२८-१९५६ या काळात लागोपाठ मिळविलेल्या ६ सूवर्ण पदकांसह, १९२८-१९८० या १२ वर्षांच्या कालखंडात पुरूष हॉकी संघाने तब्बल ११ पदके मिळविली.
  • १९२० च्या संघात २ कुस्तीगीर, ३ ॲथलिट आणि मॅनेजर यांचा समावेश होता.
  • ४ खेळाडूंमधून, फक्त फाडेप्पा चौगुले हा एकच खेळाडू मॅरेथॉन पूर्ण करु शकला. ४२.७५० किमी अंतर पार करण्यासाठी त्याने २ तास ५० मिनीटे आणि ४५.४ सेकंद अशी वेळ दिली आणि १९ व्या क्रमांकासह भारताचा पहिला ऑलिंपिक मॅरेथॉन धावपटू होण्याचा बहूमान फाडेप्पा चौगुले याला मिळाला.
  • भारतीय ऑलिंपिक असोसिएशन ह्या भारताच्या राष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेची स्थापना १९२७ साली झाली.

ऑलिंपिक स्पर्धा । Olympic Games

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जातात. सर्वात पहिली उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा १८९६ साली ग्रीसच्या अथेन्समध्ये भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९१६, १९४० व १९४४ चा अपवाद वगळता) उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जाते.

India In Olympic​

वेळापत्रक । Time Table

  • अथेन्स, ग्रीस | ६ ते १५ एप्रिल १८९६
  • पॅरिस, फ्रान्स | २० मे ते २८ऑक्टोबर १९००
  • सेंट लुई, मिसौरी, यूएसए | १ जुलै ते २३ नोव्हेंबर १९०४
  • लंडन, इंग्लंड | २७ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर १९०८
  • स्टॉकहोम, स्वीडन | ५ मे ते २२ जुलै १९१२
  • बर्लिन, जर्मनी | रद्द
  • अँटवर्प, बेल्जियम | २० एप्रिल ते १२ सप्टेंबर १९२०
  • पॅरिस, फ्रान्स | ४ मे ते २७ जुलै १९२४
  • आम्सटरडॅम, नेदरलँड | १७ मे ते १२ ऑगस्ट १९२८
  • लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया, यूएसए | ३० जुलै ते १४ ऑगस्ट १९३२
  • बर्लिन, जर्मनी | १ ते १६ ऑगस्ट १९३६
  • टोकियो, जपान | रद्द
  • लंडन, इंग्लंड | रद्द
  • लंडन, इंग्लंड | २९ जुलै ते १४ ऑगस्ट १९४८
  • हेलसिंकी, फिनलँड | १९ जुलै ते ३ ऑगस्ट १९५२
  • मेलबर्न, ऑस्ट्रेलिया | २२ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर १९५६
  • रोम, इटली | २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर १९६०
  • टोकियो, जपान | १० ते २४ ऑक्टोबर १९६४
  • मेक्सिको सिटी, मेक्सिको | १२ ते २७ ऑक्टोबर १९६८
  • म्युनिक, जर्मनी | २६ ऑगस्ट ते १० सप्टेंबर १९७२
  • मॉन्ट्रियल, कॅनडा | १७ जुलै ते १ ऑगस्ट १९७६
  • मॉस्को, सोव्हिएत युनियन | १९ जुलै ते ३ ऑगस्ट १९८०
  • लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया, यूएसए | २८ जुलै ते १२ ऑगस्ट १९८४
  • सोल, कोरिया प्रजासत्ताक | १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर १९८८
  • बार्सिलोना, स्पेन | २५ जुलै ते ९ ऑगस्ट १९९२
  • अटलांटा, जॉर्जिया, यूएसए | १९ जुलै ते ९ ऑगस्ट १९९६
  • सिडनी, ऑस्ट्रेलिया | १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०००
  • अथेन्स, ग्रीस | १३ ते २९ ऑगस्ट २००४
  • बीजिंग, चीन | ८ ते २४ ऑगस्ट २००८
  • लंडन, ग्रेट ब्रिटन | २७ जुलै ते १२ ऑगस्ट २०१२
  • रिओ डी जानेरो, ब्राझील | ५ ते २१ ऑगस्ट २०१६
  • टोकियो, जपान । २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१

अगामी वेळापत्रक । Upcoming Time Table

  • बिजिंग , चीन । ४ ते २० फेब्रुवारी २०२२
  • पॅरिस, फ्रांन्स | २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४

पदक । Medals

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक

  • २५ मी रॅपिड फायर नेमबाजी – विजय कुमारला रौप्य पदक
  • ६६ किलो फ्रिस्टाईल कुस्ती – सुशिल कुमारला रौप्य पदक
  • १० मीटर एर रायफल नेमबाजी – गगन नारंग कांस्य पदक
  • महिला एकेरी बॅटमिंटन – सायना नेहवाल कांस्य पदक
  • ५१ किलो बॉक्सिंग – मेरी कोम कांस्य पदक
  • ६० किलो फ्रिस्टाईल कुस्ती – योगेश्वर दत्त कांस्य पदक

२००८ उन्हाळी ऑलिंपिक

  • १० मीटर एअर रायफल नेमबाजी – अभिनव बिंद्रा सुवर्ण
  • फ्रीस्टाईल कुस्ती ६६ किलो –सुशील कुमार कांस्य
  • बॉक्सिंग मिडलवेट – विजेंदरसिंग कांस्य

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक

  • बॅडमिंटन महिला एकेरी – पी. व्ही. सिंधू रौप्य
  • कुस्ती महिला फ्रीस्टाईल ५८ किलो – साक्षी मलिक कांस्य

२०२० उन्हाळी ऑलिंपिक

  • भाला फेक – नीरज चोप्रा सुवर्ण
  • बॅडमिंटन महिला एकेरी – पुसर्ला व्ही. सिंधू कांस्य
  • बॉक्स महिला वेल्टर (६५-६९ किलो) – लवलिना बोरगोहेन कांस्य
  • हॉकी संघ – हॉकी संघ कांस्य
  • महिला वेटलिफ्टिंग ४९ किलो – मीराबाई चानू साईखोम रौप्य
  • पुरुषांची फ्रीस्टाइल कुस्ती ५७ किलो – रवी कुमार रौप्य
  • पुरुषांची फ्रीस्टाइल कुस्ती ६५ किलो –बजरंग पुनिया कांस्य

ऑलिंपिक स्पर्धेचे प्रतिक | Olympics Emblem

खेळाची निशाणी म्हणजे एकात एक गुंतलेले ५ रंगांचे ५ वर्तुळ. हे ५ वर्तुळ ५ खंडांना दर्शवितात. ते पुढिल प्रमाणे

ऑलिंपिक लोगो | India In Olympic​
ऑलिंपिक लोगो
Advertisements
  • निळा वर्तुळ : युरोप खंड
  • पिवळा वर्तुळ : आशिया खंड
  • काळा वर्तुळ : आफ्रिका खंड
  • हिरवा वर्तुळ : ओशिनिया खंड
  • लाल वर्तुळ : अमेरिका खंड

ऑलिंपिक पदक– Olympic Medal

  • ऑलिम्पिक खेळांमध्ये मिळणारे पदक तीन प्रकारचे असतात.
    • प्रथम विजेत्याला सुवर्ण
    • द्वितीय विजेत्याला रौप्य
    • तृतीय विजेत्याला कांस्य
  • हे पदक वर्तुळाकार असते त्यांचा व्यास ६० मिमी (कमीतकमी) आणि जाडी ३ मिमी (कमीतकमी) असते.
  • या पदकांवर आयोजक देशाचे नाव, वर्ष कोरण्यासाठी मोकळी जागा असते.
India In Olympic​
Tokyo 2020 Olympic medals
Advertisements
  • सुवर्ण पदक हे वास्तविक पाहता चांदीचे असते ज्यावर सुवर्ण मुलामा दिलेला असतो.
  • रौप्य पदक हे चांदीचे असते
  • कांस्य पदक हे तांबे आणि जस्त या धातूंच्या मिश्रणापासून बनवले जाते.
  • या पदकांचे वजन ठरलेले नसते.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment