मिताली राज

मिताली राज या भारताकडून क्रिकेट ह्या खेळात आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, एकदिवसीय सामने, २०-२० फटकांचे सामने खेळलेल्या महिला खेळाडू आहेत.

पूर्ण नाव - मिताली दोराई राज व्यवसाय - क्रिकेटपटू जन्मतारीख - ३ डिसेंबर १९८२

उंची - ५ फुट ४ इंच वय (२०२१ पर्यंत) - ३९ वर्षे जन्मस्थान - जोधपूर, राजस्थान, भारत मूळ गाव - सिकंदराबाद, भारत शाळा - कीज हायस्कूल फॉर गर्ल्स, सिकंदराबाद शैक्षणिक पात्रता -  १२ वी वैवाहिक स्थिती - अविवाहित पालक वडील- दोराई राज आई- लीला राज भाऊ - मिथुन राज (मोठा)

सुरवातीचे जिवन

मिताली १० वर्षाच्या वयातच भरतनाट्यम शिकली. काही काळापर्यंत ती भरतनाट्यम  बरोबरच क्रिकेटही खेळायची. पण शेवटी तिला आपला व्यवसाय निवडायचा होता.

तिने १९९९ मध्ये मिल्टन केन्स येथे आयर्लंडविरुद्ध वनडे पदार्पण केले.

फेब्रुवारी २०१७ मध्ये, WODI मध्ये ५,५०० धावा करणारी ती दुसरी खेळाडू ठरली.

२००३ - अर्जुन पुरस्कार २०१५ - पद्मश्री पुरस्कार २०१७ - यूथ स्पोर्ट्स आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड २०१७ - वोग स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर २०१७ - बीबीसी १०० महिला २०१७ - विस्डेन जगातील आघाडीची महिला क्रिकेटपटू २०२१ - खेलरत्न पुरस्कार