मोठी बातमी : आयपीएलमध्ये नवीन नियम लागू, आता 11 ऐवजी 15 खेळाडू खेळणार

आयपीएलमध्ये नवीन नियम लागू
शेअर करा:
Advertisements

आयपीएलमध्ये नवीन नियम लागू

आयपीएल 2023 : IPL 2023 पुढील वर्षी मार्च एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआयसह सर्व दहा संघानी तयारी सुरु केली आहे.  या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात IPL 2023 साठी मिनी लिलाव देखील होणार आहे.

आयपीएलमध्ये नवीन नियम लागू

 IPL 2023 साठी बीसीसीआयने ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून नवीन नियम लागू केला आहे. हा नियम यापूर्वी  फॅन फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल आणि बेसबॉलसारख्या खेळांमध्ये देखील लागू करण्यात आला आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊया संपूर्ण माहिती.


आयपीएलमध्ये नवीन नियम लागू

‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम काय आहे?

नाणेफेक दरम्यान, कर्णधाराला प्लेइंग इलेव्हनसह अशा 4 खेळाडूंची नावे द्यावी लागतील, ज्यांचा त्याला सामन्यादरम्यान वापर करायचा आहे. यापैकी संघ केवळ एका खेळाडूला पर्याय म्हणून संधी देऊ शकतो.

  • एक इम्पॅक्ट खेळाडू डावाच्या 14व्या षटकाच्या आधी प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही खेळाडूची जागा घेऊ शकतो.
  • कर्णधार, मुख्य प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक यांनी मैदानावरील अधिकाऱ्यांना किंवा चौथ्या पंचांना इम्पॅक्ट खेळाडूच्या आगमनाची माहिती दिली पाहिजे.
  • प्रथम फलंदाजी करताना संघाने लवकर विकेट गमावल्यास ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाच्या मदतीने गोलंदाजाऐवजी पर्यायी खेळाडू म्हणून अतिरिक्त फलंदाजाला संधी मिळू शकते.
  • दुसरीकडे, प्रथम फलंदाजी करताना संघाने अनेक विकेट गमावल्या नाहीत, तर दुसऱ्या डावात संघ एका फलंदाजीऐवजी अतिरिक्त गोलंदाजाचा संघात समावेश करू शकतो.
  • मात्र, पर्यायी खेळाडू आल्यानंतर मैदान सोडणाऱ्या खेळाडूला पुन्हा सामन्यात भाग घेता येणार नाही. 

नमस्कार, माझे नाव माहेश्वरी सोनार ,माझे शिक्षण-(Comp Eng). मी एक व्हॉलीबॉल खेळाडू असुन मी माझ्या माहितीच्या अधारावर आणि स्पोर्ट खेलोच्या माध्यमातुन आपल्या सर्वांनपर्यंत स्पोर्टबद्दल जास्तीत जास्त माहिती पोहचवण्याचा पर्यंत्न करेल

Leave a Comment

Advertisements