India vs England : चालू आसलेल्या टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारत आणि इंग्लंड येत्या १३ नोव्हेबंर ला सेमीफायनल सामन्यासाठी आमने सामने येणार आहे. त्या मॅच आधी भारत वि इंग्लंड यांच्यातल्या आकडेवारीवर एक नजर टाकूया..

India vs England
जून १९३२ मध्ये भारत आणि इंग्लंड प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळले होते, दोन्ही संघांनी काही वर्षांमध्ये काही संस्मरणीय खेळांची निर्मिती केली आहे हे आपल्या सर्वाना माहित आहे.
२००२ मध्ये नॅटवेस्ट सिरीज फायनल, २०२१ मध्ये लॉर्डस्वर भारताचा कसोटी विजय, २०१२ मधील वानखेडे येथे मालिका निश्चित करण्याच्या कसोटीमध्ये वानखेडेवर इंग्लंडचे वर्चस्व हे २ पॉरमॅट क्रिकेट हे या दोन संघातील अविस्वमरणीय सामने आहेत.
इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९५२ नंतर २० वर्षांनी पहिला कसोटी विजय मिळवला.
युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉड विरुद्ध एका षटकात सहा षटकार मारले हे सप्टेंबर २००७ मध्ये झालेल्या पहिल्या भारत विरुद्ध इंग्लंड T20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे मुख्य आकर्षण होते. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने त्या सामन्यात १८ धावांनी विजय मिळवला.
एकूणच, तिन्ही फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांमधील २५९ सामन्यांमध्ये टीम इंडियाने १०० जिंकले आहेत, तर इंग्लंडने १०४ विजयांसह किंचित आघाडी घेतली आहे.
वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड
स्पर्धा | मॅच | भारत जिंकला | इंग्लंड जिंकला | ड्रॉ/टाय/एनआर |
५० षटकांचा विश्वचषक | ८ | ३ | ४ | १ |
टी-२० विश्वचषक | ३ | २ | १ | ० |
एकूण | ११ | ५ | ५ | १ |
क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड आमने-सामने
स्वरूप | मॅच | भारत जिंकला | इंग्लंड जिंकला | ड्रॉ/टाय/एनआर |
कसोटी | १३१ | ३१ | ५० | ५० |
एकदिवसीय | १०६ | ५७ | ४४ | ५ |
टी-२० | २२ | १२ | १० | ० |
एकूण | २५९ | १०० | १०४ | ५५ |