मोठी बातमी : बांगलादेश दौऱ्यासाठी ‘या’ दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी
पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ 3 वनडे व 2 कसोटी सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. या संघात निवड झालेला अष्टपैलू रवींद्र जडेजा हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे भारतीय संघात दोन नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे.
बांगलादेश दौऱ्यासाठी ‘या’ दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबतची अधिकृत घोषणा काल केली.
Update: Team India (Senior Men) and India A squad for Bangladesh tour announced.
— BCCI (@BCCI) November 23, 2022
Mored details here – https://t.co/VnBdNf60mN #TeamIndia
दयालला पाठीच्या खालच्या भागात दुखणे आसल्यामुळे तो मालिकेतून बाहेर पडला आहे तर जडेजा अद्याप त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीतून बरा झालेला नाही त्यामुळे बीसीसीआय ने दोन नवीन खेळांडूना या जागी स्थान दिले आहे
अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने बांगलादेशविरुद्ध डिसेंबरमध्ये होणाऱ्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी यश दयाल आणि रवींद्र जडेजा यांच्या जागी वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आणि अष्टपैलू शाहबाज अहमद यांची निवड केली आहे.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन.