मेस्सीने रचला इतिहास
फीफा विश्वचषक 2022 : फिफा मध्ये अता बाद फेरीचे सामने सुरु झाले आहेत. सुपर १६ संघ यामध्ये आपले स्थान पक्के करण्याच्या मागे लागला आहे. बाद फेरितला २ सामना रविवारी (4 डिसेंबर) भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 वाजता अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ARG vs AUS) रंगला.
अर्जेंटिनाने राऊंड ऑफ 16 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 2 – 1 असा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. अर्जेंटिनाकडून कर्णधार लिओनेल मेस्सी, जुलिआन अल्वारेझ यांनी गोलं केला.
Argentina secure their spot in the Quarter-finals! 👏@adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 3, 2022
आता अर्जेंटिनाचा क्वार्टर फायनलमध्ये नेदरलँडशी मुकाबला होणार आहे.
मेस्सीने रचला इतिहास
या सामन्यात अर्जेंटिनाचा स्टार लियोनल मेस्सी (Lionel Messi) याने इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो त्याच्या कारकिर्दीतील 1000वा सामना खेळत होता. त्याचबरोबर तो अर्जेंटिनाकडून विश्वचषकात सर्वाधिक 9 गोल करणारा खेळाडू ठरला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मेस्सीने 35व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर त्याने विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या यादीत पोर्तुगलचा क्रिस्तियानो रोनाल्डो याला मागे टाकले आहे
Leo Messi + Julian Alvarez = GOALS 🔥
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 3, 2022
Watch the highlights from Argentina's win over Australia for free on FIFA+ now! 👇
मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत अर्जेंटिना, बार्सिलोना क्लब आणि पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) क्लब यांच्याकडून खेळताना एकूण 789 गोल आणि 338 असिस्ट केल्या आहेत.