मोहम्मद शमी शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाला ” दुखापत…..

मोहम्मद शमी शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाला ” दुखापत…..

भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे, यामध्ये भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध ३ वनडेमालिका आणि तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. शमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मोहम्मद शमी शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाला " दुखापत.....
Source – mdshami.11
Advertisements

मोहम्मद शमी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-20 विश्वचषक खेळला होता. यानंतर शमी परतल्यावर सरावाच्या वेळीच दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला.


[irp]

मोहम्मद शमी शेअर केली भावूक पोस्ट

या दरम्यान मोहम्मद शमी ने आपल्या सोशलमिडिया अकाउंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.

त्यात त्याने म्हणले आहे, ” दुखापत सर्वसाधारण आहे. प्रत्येक क्षणाचे कौतुक करायला शिकवते. माझ्या कारकिर्दीत मला अनेक दुखापती झाल्या आहेत. हे तुम्हाला एक दृष्टीकोन देते.” तसेच, माझ्या कारकिर्दीत मी किती वेळा दुखावलो हे महत्त्वाचे नाही. मी प्रत्येक वेळी दुखापतींमधून शिकलो आहे. यासह जोरदार पुनरागमन केले आहे.

बांगलादेशमध्ये तीन वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी होणार आहे. मोहम्मद शमी शेअर केली भावूक पोस्ट

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment