लिओनेल मेस्सीने रचला इतिहास
कतार येथे खेळल्या जाणाऱ्या फीफा विश्वचषक 2022 च्या स्पर्धेत 1 डिसेंबर दोन सामने खेळले गेले. मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचा रॉबर्ट लेवांडोस्कीच्या नेतृत्वाखालील पोलंड विरुद्ध सी गटातील महत्त्वाच्या सामन्यात 974 स्टेडियमवर सामना झाला. ज्यामध्ये अर्जेंटिनाने 2-0 ने विजय मिळवला.

या विजयाबरोबरच अर्जेंटिनाने ग्रुप सी च्या गुणतालिकेत १ले स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सुपर 16 मध्ये अर्जेंटिनाचा सामना ऑस्ट्रेलियाशी (4 डिसेंबर) होणार आहे.
Argentina turn on the style to finish top of Group C!@adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 30, 2022
लिओनेल मेस्सीने रचला इतिहास
या सामन्यासाठी मैदानावर उतरताच लिओनेल मेस्सीने इतिहास रचला. तो अर्जेंटिनाकडून विश्वचषकाचे सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला. याबाबतीत त्याने दिग्गज मेराडॉना यांना मागे टाकले. मेस्सीने 22 सामने खेळताना 15 सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे.
मेस्सीने कतारमधील लुसेल स्टेडियमवर मेक्सिकोविरुद्ध केलेल्या प्रभावी स्ट्राईकसह ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या विश्वचषकातील गोलसंख्येशीही बरोबरी साधली.
अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सी हा देखील एकमेव पुरुष खेळाडू आहे ज्याने अर्जेंटिनासाठी 5 विश्वचषक मोहिमेमध्ये मदत केली आहे.