बातमी : बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वय लपवल्याचा गुन्हा

बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वय लपवल्याचा गुन्हा

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने आपल्या वयाबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

बंगळुरू येथील एका बॅडमिंटन अकादमीच्या एम.जी.नागराजा नावाच्या संचालकाने लक्ष्य व त्याचे प्रशिक्षक विमल कुमार यांच्यावर लक्ष्यने वय लपविल्याचा आरोप केला आहे.

बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वय लपवल्याचा गुन्हा
बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वय लपवल्याचा गुन्हा
Advertisements

त्यानुसार २१ वर्षीय लक्ष्यविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात लक्ष्य आणि विमलकुमार यांच्यासह त्याचे वडील धीरेंद्र सेन, भाऊ चिराग सेन आणि आई निर्मला सेन ह्यांनासुद्धा आरोपी करण्यात आले आहे.

लक्ष्य सेन हा मुळचा उत्तराखंडचा असला तरी बंगळुरूतील प्रकाश पदुकोण अकादमीत तो प्रशिक्षण घेतो. शिवाय त्याचे वडील धीरेंद्र हेसुध्दा भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक आहेत तर त्याचा भाऊ हासुध्दा बॅडमिंटनपटू आहे.

लक्ष्य सध्या बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. त्याला आताच देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. 

लक्ष्य याने भारतीय बॅडमिंटन संघटनेकडे त्याचा जन्मदिवस १६ ऑगस्ट २०२१ असा नोंदवला आहे; तर चिरागने २२ जुलै १९९८ असे नोंदवले आहे, पण नागराज यांचा दावा आहे की त्याची खरी जन्मतारीख १९९८ मधील आहे.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment