World Athletics U20 Championships : भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने रौप्य आणि प्रियांशी प्रजापतने कांस्यपदक जिंकले

World Athletics U20 Championships भारताची युवा कुस्तीपटू प्रिया मलिक हिने २०२२ च्या जागतिक अंडर-२० चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक, तर प्रियांशी प्रजापतने कांस्यपदक जिंकले.

World Athletics U20 Championships
World Athletics U20 Championships
Advertisements

World Athletics U20 Championships

सोफिया, बल्गेरिया येथे गुरुवारी झालेल्या U20 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी दोन पदके जिंकली.

प्रिया मलिक (७६ किलो) हिने रौप्यपदक तर प्रियांशी प्रजापत (५० किलो) ने कांस्यपदक जिंकले.

प्रिया मलिकला अंतिम फेरीत जपानच्या अयानो मोरोकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

प्रिया गेल्या वर्षी अंडर १७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक विजेती होती.

प्रियांशी प्रजापतने कांस्यपदकाच्या लढतीत मंगोलियाच्या मुंखगेरेल मुंखबातचा १२-४ असा पराभव केला.

तथापि, सितो (५७ किलो), भाग्यश्री (५९ किलो) आणि आरजू (६८ किलो) यांच्यासाठी निराशा झाली कारण या तिघांनाही आपापल्या कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.

या दोन पदकांमुळे भारताच्या पदकांची संख्या ९ वर पोहोचली आहे.

भारतीय पुरुषांच्या फ्रीस्टाइलने यापूर्वी चॅम्पियनशिपमध्ये १ रौप्य आणि ६ कांस्य पदकांसह सात पदके जिंकली होती.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment