Virat Kohli Breaks Record : माजी भारतीय कर्णधार, विराट कोहलीने टी-२० च्या विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आपला मजबूत फॉर्म सुरू ठेवला आहे आणि बुधवारी बांगलादेशविरुद्ध त्याने ४४ चेंडूत ६४ धावांची नाबाद पारी खेळली. बांगलादेशविरुद्ध आपल्या ६४ धावांच्या खेळीने विराट कोहलीने महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि महेला जयवर्धने यांचे विक्रम मोडीत काढले.
फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक विजेत्यांची यादी, हे संघ आघाडीवर
Virat Kohli Breaks Record
कोहलीने टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३रे अर्धशतक चार डावात झळकावले आणि बुधवारी २ नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या स्पर्धेत भारताने बांगलादेशचा ५ धावांनी (डीएलएस पद्धतीने) पराभव केल्यामुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले.
.@imVkohli bagged the Player of the Match award as #TeamIndia beat Bangladesh in Adelaide. 👌 👌
— BCCI (@BCCI) November 2, 2022
Scorecard ▶️ https://t.co/Tspn2vo9dQ#T20WorldCup | #INDvBAN pic.twitter.com/R5Qsl1nWmf
विराट कोहलीने महान सचिन तेंडुलकरचा ऑस्ट्रेलियन भूमीवर भारतीयाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला. क्रिकेटचा महान खेळ खेळणाऱ्या सचिनने ऑस्ट्रेलियात ८४ डावांमध्ये ४२.८५ च्या सरासरीने ३,३०० धावा केल्या. दुसरीकडे, कोहलीने ५७ सामन्यांमध्ये ५६.७७ च्या सरासरीने ३३५० धावा करून सचिनला मागे टाकले.
त्याने पुरुषांच्या T20 विश्वचषकाच्या इतिहासात महेला जयवर्धनेचा सर्वाधिक धावांचा विक्रमही मागे टाकला. जयवर्धनेने ३१ डावांत १०१६ धावा केल्या होत्या, तर कोहलीने आता २३ डावांत १०६५ धावा केल्या आहेत.
Virat Kohli has the most runs in #T20WorldCup history while only being dismissed 12 times 😲
— ICC (@ICC) November 3, 2022
Highlights from his best knocks ➡️ https://t.co/UXw1HhPzpT pic.twitter.com/IdU9nWTmvA