Virat Kohli Breaks Record : माजी भारतीय कर्णधार, विराट कोहलीने टी-२० च्या विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आपला मजबूत फॉर्म सुरू ठेवला आहे आणि बुधवारी बांगलादेशविरुद्ध त्याने ४४ चेंडूत ६४ धावांची नाबाद पारी खेळली. बांगलादेशविरुद्ध आपल्या ६४ धावांच्या खेळीने विराट कोहलीने महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि महेला जयवर्धने यांचे विक्रम मोडीत काढले.

फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक विजेत्यांची यादी, हे संघ आघाडीवर
Virat Kohli Breaks Record
कोहलीने टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३रे अर्धशतक चार डावात झळकावले आणि बुधवारी २ नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या स्पर्धेत भारताने बांगलादेशचा ५ धावांनी (डीएलएस पद्धतीने) पराभव केल्यामुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले.
.@imVkohli bagged the Player of the Match award as #TeamIndia beat Bangladesh in Adelaide. 👌 👌
— BCCI (@BCCI) November 2, 2022
Scorecard ▶️ https://t.co/Tspn2vo9dQ#T20WorldCup | #INDvBAN pic.twitter.com/R5Qsl1nWmf