Road Safety World Series 2022: रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२२ ची दुसरी आवृत्ती येत्या १० सप्टेंबर २०२२ रोजी कानपूर येथे सुरू होईल.

२२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील क्रिकेटचे विविध दिग्गज T20 सामन्यांमध्ये भाग घेतील आणि देशात रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करतील.
Asia Cup Super 4 schedule : भारत वि पाक, श्रीलंका वि अफगाणिस्तान; तारखा, वेळा, ठिकाणे, संघ
Road Safety World Series 2022
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२२ ची दुसरी आवृत्ती येत्या १० सप्टेंबर २०२२ रोजी कानपूर येथे सुरू होईल.
RSWS २०२२ मध्ये सहभागी होणारे आठ संघ भारत लिजेंड्स, इंग्लंड लीजेंड्स, ऑस्ट्रेलिया लीजेंड्स, वेस्ट इंडिज लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स, दक्षिण आफ्रिका लीजेंड्स, बांगलादेश लीजेंड्स आणि न्यूझीलंड लीजेंड्स आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर गतविजेत्या इंडिया लिजेंड्सचे नेतृत्व करेल.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२२: तारिख
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२२, १० सप्टेंबरपासून सुरू होईल आणि १ ऑक्टोबर २०२२ रोजी संपेल.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२२: ठिकाणे
हे सामने कानपूर, रायपूर, इंदूर आणि डेहराडून येथे खेळवले जाणार आहे. सलामीचा सामना कानपूरमध्ये होईल तर रायपूरमध्ये दोन उपांत्य फेरी आणि एक अंतिम सामना होणार आहे.
The Road Safety World Series is coming to your nearest cities! ✨🙌🏻
— Road Safety World Series (@RSWorldSeries) September 3, 2022
Stay tuned, the fixtures are coming out soon.#RSWS Season 2, September 10-October 1, 2022!
Tickets are live on @bookmyshow
🎟️#RoadSafetyWorldSeries #Kanpur #Indore #Dehradun #Raipur #Bookmyshow #Cricket pic.twitter.com/0Mh2562y5u