IND vs PAK : टीम इंडियाचा नवीन रेकॉर्ड; T20I मध्ये पाकिस्तान विरुद्ध सर्वात जलद १०० धावा

IND vs PAK : आशिया चषक सुपर ४ भारत वि पाक मधील सामन्यांत काल जरी पाकिस्तान विजयी झाला असला तरी भारताने या सामन्यात सर्वात जलद १०० धावा करुन नवीन रेकॉर्ड बनवले आहे.

IND vs PAK
IND vs PAK

ASIA CUP 2022 Points Table | आशिया कप २०२२ पॉईंट टेबल

IND vs PAK

आशिया चषक सुपर ४च कमकीत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या T20I सामन्यात त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात जलद १०० धावांची नोंद केली रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने रविवारी दुबईमध्ये फक्त १०.४ षटकांत हा आकडा गाठला.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी धडाकेबाज सलामी दिली आणि ५० पेक्षा जास्त धावांची सलामी दिली ज्यामुळे मेन इन ब्लू ला केवळ १०.४ मध्ये १०० धावांचा टप्पा गाठण्यात मदत झाली. 

रोहित १६ चेंडूत २८ धावांवर बाद झाला, तर सहाव्या षटकात २० चेंडूत २८ धावांवर केएल राहुलचा बाद झाला. सलामीवीर निघून गेल्यावर कोहली आणि फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादव यांनी पॉवर हिटिंग सुरूच ठेवली, पण सुर्यकुमार १० चेंडूत १३ धावांवर बाद झाला. 

दरम्यान, दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा (उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर), दिनेश कार्तिक आणि आवेश खान यांच्या जागी भारताने हार्दिक पंड्या, दीपक हुडा आणि रवी बिश्नोई यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले होते.

Source – espncricinfo


नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment