न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पहिला सेमी फायनल सामना कुठे पाहायचा?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पहिला सेमी फायनल सामना : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु आसलेल्या टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत आता सेमीफायनलच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे चार संघ सेमीसमध्ये पोहोचले आहेत.

आता या सेमीफायनलमध्ये पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड तर दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात असणार आहे. दरम्यान पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीललंडमध्ये आज ८ नोव्हेंबर २०२२ रोजी खेळवला जाणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पहिला सेमी फायनल सामना कुठे पाहायचा?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पहिला सेमी फायनल सामना

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पहिला सेमी फायनल सामना कुठे पाहायचा?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अ‍ॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय आपल्या https://sportkhelo.co.in साईटवरही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.


न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना कधी होणार आहे?

भारतीय वेळेनुसार न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना दुपारी १.३० वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 


न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे आहे ?

हा न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील सिडनी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  


प्लेंइग ११ संघ

न्यूझीलंडचा संघ

केन विल्यमसन (कर्णधार), टिम साउदी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अ‍ॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लॉकी फर्ग्युसन, डेवॉन कॉन्वे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन ऍलन.

पाकिस्तानचा संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद


नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment