नवीन कुमार फुटबॉलपटू | Naveen Kumar Information In Marathi

नवीन कुमार (Naveen Kumar Information In Marathi) हा एक भारतीय व्यावसायिक फुटबॉल खेळाडू आहे. सध्या तो इंडियन सुपर लीग संघ GOA FC मध्ये गोलरक्षक म्हणून खेळत आहे. तो पंजाबचा महान खेळाडू आहे.

Naveen Kumar Information In Marathi
Naveen Kumar Information In Marathi
Advertisements

वैयक्तिक माहिती | Naveen Kumar Information In Marathi

नावनवीन कुमार
व्यवसायभारतीय फुटबॉल खेळाडू
जन्मतारीख१० ऑगस्ट १९८९
वय (२०२२ प्रमाणे)३२ वर्ष
जन्मस्थानकालेवाल भगतन, होशियारपूर, पंजाब
उंची  (अंदाजे)६ फूट
वजन  (अंदाजे)८२ किलो
राष्ट्रीयत्वभारतीय
मुळ गावकालेवाल भगतन, होशियारपूर, पंजाब
पुरस्कार२००८-१० मध्ये सर्वोत्कृष्ट गोलरक्षक पुरस्कार
आंतरराष्ट्रीय पदार्पण२०११
क्लबपैलन एरोज एफसी, मोहन बागान एफसी,
लोनेस्टार काश्मीर एफसी,
चर्चिल ब्रदर्स, एफसी गोवा
वर्तमान क्लबएफसी गोवा (२०२१)
जर्सी क्रमांक#३२
खेळण्याची स्थितीगोलरक्षक
Advertisements

सिमरन बहादूर क्रिकेटर

जन्म आणि सुरवातिचे दिवस

नवीन कुमार यांचा जन्म १० ऑगस्ट १९८९ रोजी पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील कालेवाल भगतन गावात झाला.

त्यांनी आपल्या मूळ गावी कालेवाल भगतान येथून सुरुवातीचा अभ्यास पूर्ण केला. पंजाबमधील बहुतेक लोक कुस्तीमध्ये करिअर करण्याचा विचार करतात परंतु नवीनने लहानपणापासूनच फुटबॉलची आवड होती.


वृषाली गुम्माडी बॅडमिंटनपटू

करिअर

फुटबॉलपटू नवीन कुमार हा शालेय जीवनापासून फुटबॉल खेळत आहे. प्रथम शाळेच्या फुटबॉल संघात, नंतर वेगवेगळ्या संघात गोलकीपिंग करताना त्याने आपल्या खेळात प्रभुत्व मिळवले.

२००३ मध्ये, अंदमान आणि निकोबार येथे झालेल्या राज्य खेळांसाठी १७ वर्षाखालील फुटबॉल राज्य संघात त्याची गोलरक्षक म्हणून निवड झाली.

त्याच्या खेळामुळे आणि कौशल्यामुळे त्याला पंजाब लीग २००८-१० मध्ये सर्वोत्कृष्ट गोलरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवीन कुमार यांनी पायलन एरोज, मोहन बागान, लोन स्टार एफसी (काश्मीर एफसी), साळगावकर एफसी आणि गोवा एफसी इत्यादी अनेक फुटबॉल क्लबसाठी फुटबॉल खेळला आहे.

२०११ मध्ये नवीन २३ वर्षाखालील भारतीय राष्ट्रीय संघाकडूनही खेळला.

पैलान एरोज एफसी

सर्वप्रथम, त्याने २०११-१२ मध्ये पैलान एरोज एफसी सोबत आपल्या क्लब करिअरची सुरुवात केली. २०११ च्या इंडियन फेडरेशन कप दरम्यान नवीन कुमारने २०११-१२ च्या फुटबॉल हंगामाची सुरुवात पैलन एरोज (आता इंडियन एरोज) फुटबॉल क्लबने केली. या क्लबसाठी तो स्पर्धेत ३ सामने खेळला.

पैलन अ‍ॅरोज एफसी बरोबर व्यावसायिक कारकीर्द सुरू केल्यानंतर, त्याने मोहन बागान एफसी (२०१२-२०१३), लोनेस्टार काश्मीर एफसी , साळगावकर एफसी (२०१५-२०१६), आणि चर्चिल ब्रदर्स (२०१६-२०१७), एफसी गोवा (२०१६-२०१७) या क्लबचे प्रतिनिधित्व केले.

तो २०१२-१३ हंगामासाठी मोहन बागान एसीमध्ये सामील झाला.

त्यानंतर २०१४ मध्ये त्याने लोन स्टार एफसी (आता काश्मीर एफसी) वर करार केला.

२०१७-१८ च्या मोहिमेपूर्वी, त्याने गोवा एफसीशी करार केला आणि त्याच्या हिरो आयएसएलमध्ये पदार्पण केले.

२०१५ मध्ये, नवीनने साळगावकर FC सह आय-लीगमध्ये परतले .

२०१९ मध्ये, त्याने केरळ ब्लास्टर्ससोबत ५ खेळ खेळले, त्यानंतर तो कर्जावर एफसी गोवामध्ये परत गेला.

हिरो ISL २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये तो जास्तीत जास्त वेळ बेंचवर बसला होता, त्याला खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. पुढील २०२१ AFC चॅम्पियन्स लीगमध्ये, त्याने काही गेममध्ये भाग घेतला.


अक्षर पटेल क्रिकेटपटू

सोशल मिडीया आयडी

नवीन कुमार इंस्टाग्राम अकाउंट


नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment