बांगलादेशला मोठा धक्का स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

बांगलादेशला मोठा धक्का स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

Asia Cup 2023 : बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबाडोत हुसेन गेल्या महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरल्याने लवकरच चालू होना-या आशिया कप २०२३ मधून बाहेर पडला आहे.

बांगलादेशला मोठा धक्का स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर
Advertisements

हुसेनच्या जागी २० वर्षीय वेगवान गोलंदाज तनझिम हसनचा समावेश करण्यात आला आहे.

२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी हुसैन वेळेवर बरा होईल की नाही याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. तनझिम हसनने ३७ लिस्ट ए सामने खेळले आहेत आणि २८.८२ च्या सरासरीने आणि २८.८२ च्या इकॉनॉमी रेटने ५७ विकेट्स घेतल्या आहेत.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या इबादोत हुसेनने या फॉरमॅटमध्ये १२ सामने खेळले आहेत आणि २२.९० च्या सरासरीने आणि ५.६० च्या इकॉनॉमी रेटने २२ बळी घेतले आहेत. त्याने २० कसोटी आणि चार टी-२० खेळल्या आहेत. Asia Cup 2023: आशिया कपमधील समालोचकांची संपूर्ण यादी

BCB चे मुख्य क्रीडा फिजिशियन डॉ. देबाशिस चौधरी म्हणाले:

“इबाडॉटला दुखापतीनंतर सहा आठवडे पुनर्वसन करण्यात आले होते. या काळात आम्ही अनेक एमआरआय केले आहेत आणि अहवाल असे सूचित करतात की त्याचे एसीएल अजूनही चिंताजनक आहे आणि पुढील व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. त्यामुळे तो आशिया कपला मुकणार आहे.”

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment