आयपीएल २०२२ कोणत्या खेळाडूंना रिटेन केले? | IPL 2022 Retention In Marathi

आयपीएल २०२२ (IPL 2022 Retention In Marathi) मध्ये खेळाडूंचे रिटेनशन काल पार पडले आहे. चेन्नई सुपर किंग्जने एमएस धोनी, रवींद्र जाडेजा, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड या चार खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने रिटेन करत विराट कोहली पेक्षा जास्त पैसे दिले आहेत.

आयपीएलच्या पुढच्या हंगामात नेमके कोणते खेळाडू ठेवायचे, हा निर्णय काल सर्व संघांना घ्यायचा होता. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त चारच खेळाडू रिटेन करता येऊ शकत होते, कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूंना रिटेन केलं आहे, पाहा…..

IPL 2022 Retention In Marathi


वाचा । आयपीयल २०२२ संघ मालकांची यादी मराठीत

मुंबई इंडियन्स

रोहितला या सीझनसाठी तब्बल १६ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र विराट कोहलीला आरसीबीकडून १५ कोटी रुपयात रिटेन करण्यात आलं आहे.

मुंबईकडून दुसरा खेळाडू जसप्रीत बुमराह रिटेन करण्यात आला आहे. त्याला यंदाचं आयपीएल खेळण्यासाठी १२ कोटी रुपये मिळणार आहेत. तर तिसरा खेळाडू सुर्यकुमार यादवचं ८ कोटी रुपयात रिटेन्शन करण्यात आलं आहे. मुंबईने कायरन पोलार्डचंही ६ कोटी रुपये देऊन रिटेन्शन केलं आहे.


वाचा । आयपीएलची माहिती

आरसीबी (RCB)

आरसीबीकडून रिटेन करण्यात आलेल्या खेळाडुंमध्ये विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराजचा समावेश आहे.

विराट कोहलीला यंदाच्या आयपीएलसाठी १५ कोटी रुपये मिळणार आहेत. तर ग्लेन मॅक्सवेल याला ११ कोटी रुपये मिळणार आहेत. तर तिसरा खेळाडू मोहम्मद सिराजला ७ कोटी रुपये मिळतील. यावेळी सर्वात मोठी बोली के. एल. राहुलवर लागण्याची शक्यता आहेत.


चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनीला (IPL 2022 Retention In Marathi) पहिला खेळाडू म्हणून रिटेन केला नाही. त्यामुळे धोनीला यावेळी १६ कोटी रुपये मिळणार नाहीत.

चेन्नईच्या संघाने पहिल्यांदा रिटेन करण्यासाठी रवींद्र जडेजाला पसंती दिली आहे. त्यामुळे जडेजाला यावेळी १६ कोटी रुपये मिळाले आहे.

चेन्नईने रिटेन करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरे नाव धोनीचे घेतले असून त्याला १२ कोटी रुपये देण्यात येतील. चेन्नईच्या संघाकडून मोईन अली आणि ऋतुराज गायकवाडला रिटेन करण्यात आले आहे. चेन्नईने त्यांना अनुक्रमे ८ आणि ६ कोटी रुपये देत आपल्या ताफ्यात कायम ठेवले आहे.


वाचा । एलेक्सिया पुटेलास फुटबॉलपटू

किंग्स इलेव्हन पंजाब

पंजाबच्या संघाने यावेळी लोकेश राहुलला संघाबाहेर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. पंजाबने यावेळी सलामीवीर मयांक अगरवाल आणि युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना संघात कायम ठेवले आहे.

मयंक अग्रवालला १४ कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. तर अर्शदीप सिंगला ४ कोटी रुपये इतक्या रक्कमेत कायम ठेवण्यात आले. 


सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनपूर्वी त्यांच्या संघात कायम ठेवलेल्या (रिटेन केलेल्या) खेळाडूंची घोषणा केली आहे.

या फ्रेंचायझीने तीन खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. यामध्ये केन विल्यमसन, उम्रान मलिक आणि अब्दुल समद यांचा समावेश आहे. 


वाचा । दीपिका पल्लीकल माहिती

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने यावेळी चार खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, यामध्ये कर्णधार रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि एनरिच नॉर्टजे यांना कायम ठेवले आहे.

ऋषभ पंतला १६ कोटी रुपये, अक्षर पटेलला ९ कोटी रुपये मिळतील. पृथ्वी शॉला ७.५ कोटी आणि एनरिक नॉर्खियाला ​​६.५ कोटी रुपये मिळतील.


कोलकाता नाइट रायडर्स

कोलताच्या संघाने यावेळी आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर आणि सुनील नरिन यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आंद्रे रसेलला १२ कोटी, व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांना ८-८ कोटींमध्ये त्यांनी संघात कायम राखलं आहे. तर सुनील नारायणला ६ कोटींमध्ये कायम ठेवलं आहे. 


वाचा । भवानी देवी तलवारबाज

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्सच्या संघाने यावेळी कर्णधार संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांना कायम ठेवले आहे. राजस्थानच्या संघाने यावेळी बेन स्टोक्सला कायम न ठेवत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.

संजू सॅमसनला १४ कोटी मिळणार आहेत. जॉस बटलरला १० कोटींमध्ये तर यशस्वी जयस्वालला ४ कोटींमध्ये रिटेन केलं आहे.


नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment