India Women vs UAE Women Live Score :
दीप्ती शर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी १०० हून अधिक धावांची भागीदारी केली आहे.
दीप्ती शर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्स या दोघींनी १५ व्या षटकात आपली अर्धशतके पूर्ण केली त्यांच्या भागीदारीने महिला आशिया कपमध्ये UAE विरुद्ध भारताला पुनरुज्जीवित केले.
डावाची सुरुवात करताना त्रृचा घोष गोल्डन डकवर बाद झाल्याने फलंदाजीच्या क्रमाने भारताचा प्रयोग उलटला. कालच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारी सभिनेनी मेघना पुढे होती आणि दयालन हेमलता शून्यावर बाद होणारी दुसरी भारतीय फलंदाज ठरल्यानंतर परिस्थिती आणखी वाईट होत गेली.
तीन डावात लवकर, भारताला भागीदारीची गरज होती आणि दीप्ती (६४) आणि जेमिमाहने (७५*) त्यांना १२८ धावांची भागीदारी करून मजबूत धावसंख्या उभारून दिली.
या दोघींच्या भागीदारीने भारताने १७८/५ आशी मजल मारली.
युएईला आता जिंकण्यासाठी १७९ धावाची गरज आहे.
#TeamIndia post 178/5 on the board against the United Arab Emirates. 👏 👏
— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2022
7⃣5⃣* for @JemiRodrigues
6⃣4⃣ for @Deepti_Sharma06
Over to our bowlers now. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/Y03pcadPIo#AsiaCup2022 | #INDvUAE pic.twitter.com/jz5gGuAmGI
राजेश्वरी गायकवाडने सुरुवातीच्या विकेट्स घेत यूएईचा पराभव केला. IND (१७८/५) ने UAE (७४/४) चा १०४ धावांनी पराभव केला
.@JemiRodrigues scored a superb 7⃣5⃣* & bagged the Player of the Match award as #TeamIndia beat UAE. 👏 👏 #AsiaCup2022 | #INDvUAE
— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2022
Scorecard ▶️ https://t.co/Y03pcauSKo pic.twitter.com/h3TGNvduaO