ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, स्मृती मानधनावर मोठी जबाबदारी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

अखिल भारतीय महिला निवड समितीने आगामी महिलांच्या पाच सामन्यांच्या मास्टरकार्डसाठी भारताचा संघ निवडला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय महिला 9 डिसेंबरपासून 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भारतीय संघ मोठ्या व्यासपीठावर दिसणार आहे, तर मराठमोळ्या स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची जवाबदारी सोपवण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

भारताच्या संघात शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 ला, दुसरा सामना 11, तिसरा सामना 14, चौथा सामना 17 आणि पाचवा सामना 20 डिसेंबरला खेळला जाणार आहे. 


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारताचा संघ:  हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह ठाकूर सिंग, अंजली सरवाणी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल

ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी संघ जाहीर केला असून कर्णधारपद एलिसा हेलीकडे आहे. 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मालिका मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि CCI या दोन ठिकाणी खेळवली जाईल. पाच सामन्यांपैकी पहिला सामना ९ डिसेंबरला खेळवला जाईल आणि मालिका २० डिसेंबरला संपेल. येथे पूर्ण वेळापत्रक आहे

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतटी-२० वेळापत्रक

नं.तारीखमॅचठिकाण
9 डिसेंबरपहिला T20Iडीवाय पाटील स्टेडियम
211 डिसेंबरदुसरा T20Iडीवाय पाटील स्टेडियम
314 डिसेंबरतिसरा T20ICCI
417 डिसेंबरचौथी T20ICCI
20 डिसेंबर5वी T20ICCI

नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment

Advertisements