फुटबॉल स्टार पेलेनी इंस्टाग्रामवर शेअर केली भावूक पोस्ट

फुटबॉल स्टार पेलेनी इंस्टाग्रामवर शेअर केली भावूक पोस्ट

सध्या जगभरात फुटबॉल विश्वचषकाची चर्चा सुरू आहे. परंतू त्याचवेळी फुटबॉल तसेच संपूर्ण क्रीडाविश्वाला चिंतेत टाकणारी एक बातमी म्हणजे ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू व फुटबॉलचे सम्राट पेले यांची प्रकृती खराब झाली होती. पण आता त्यांच्या प्रकृतीचे अपडेट पुढे आले आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे समोर येत आहे.

फुटबॉल स्टार पेलेनी इंस्टाग्रामवर शेअर केली भावूक पोस्ट
फुटबॉल स्टार पेलेनी इंस्टाग्रामवर शेअर केली भावूक पोस्ट
Advertisements

फुटबॉल स्टार पेले यांना कॅन्सरचे निदान झाले असून त्यांच्यावर‌ उपचार केले जात आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 82 वर्षीय पेले यांच्यावर कॅन्सर रुग्णांसाठी केली जाणारी किमोथेरपी सुरू आहे.

पेले यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी म्हणले आहे,

“माझ्या मित्रांनो, मला सर्वांना शांत आणि सकारात्मक ठेवायचे आहे. मी आशेने मजबूत आहे आणि मी नेहमीप्रमाणे माझ्या उपचारांचे पालन करतो. मला मिळालेल्या सर्व काळजीबद्दल मी संपूर्ण वैद्यकीय आणि नर्सिंग टीमचे आभार मानू इच्छितो. माझा देवावर खूप विश्वास आहे आणि तुमच्याकडून मला जगभरातून मिळणारा प्रेमाचा प्रत्येक संदेश माझ्यात ऊर्जा भरून ठेवतो आणि विश्वचषकातही ब्राझीलला खेळताना पाहिले. सर्वांचे धन्यवाद.”

फुटबॉल स्टार पेलेनी इंस्टाग्रामवर शेअर केली भावूक पोस्ट

पेले बद्दल बोलायचे झाले तर त्यांनी ब्राझीलला अवघ्या 17व्या वर्षी विश्वचषक जिंकून दिला होता. त्यांनी 1958 मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सूदान विरुद्ध दोन गोल केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 1958, 1962 आणि 1970 रोजी आसे तीन विश्वचषक जिंकले आहेत. कारकिर्दीत त्यांनी एकूण 1363 सामने खेळताना 1281 गोल आणि ब्राझीलकडून 92 सामन्यांमध्ये 77 गोल केले.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment