महिला अंध क्रिकेट संघाने IBSA वर्ल्ड गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले
भारताच्या अंध महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला. भारतीय महिला संघाने ऑस्ट्र्लियाला पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने शनिवारी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सस राखून पराभव करत इतिहास रचला. या विजयासह भारताने सुवर्णपद पटकावले आहे.
Heartiest Congratulations to the Indian women's blind cricket team on winning gold at the #IBSAWorldGames 🏏
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 26, 2023
You have made the nation proud with your remarkable game, dedication, and a never-say-die attitude.
Best wishes for future endeavours. pic.twitter.com/in18NhYvGQ
फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने २० षटकात ८ विकेट्स गमावत ११४ धावाची मजल मारली. परंतू, टीम इंडियाने ३.३ षटकात एका विकेटच्या मोबदल्यात ४३ धावा करत सुवर्णपदक जिंकले. IBS वर्ल्ड गेम्समध्ये टीम इंडियाला प्रथमच सुवर्णपदक जिंकण्यात यश आले आहे.
यापूर्वी भारताच्या महिला अंध संघाला एकदाही सुवर्णपदक जिंकता आले नव्हते. त्यामुळे भारतीय अंध महिला संघासाठी हा सुवर्णदिन आहे.
या विजयानंतर त्यांच्याकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत, कारण त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या दिगज्ज संघाला पराभूत केले आहे. त्यामुळे या सामन्यानंतर ते कशी कामगिरी करतात, याची उत्सुकता सर्वांना असेल हे नक्की.