‘ टी-20 विश्वचषक 2007 ’ वर लवकरच वेब सिरीज प्रदर्शित होणार

टी-20 विश्वचषक 2007 : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी टी 20 विश्वचषक 2007 हा एक स्मरणीय अनुभव आहे. महेंद्रसिंग धोनी च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 मध्ये पहिल्यांदा टी 20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक आपल्या नावावर केला होता.

टी-20 विश्वचषक 2007
Advertisements

[irp]

टी-20 विश्वचषक 2007

2007 मधील मधील विश्वचषक सर्वांना नेहमीच परत परत बघावा वाटतो. तुम्हाला आता हा क्षण ओटीपी प्लॅटफॉर्मवरही बघता येणार आहे. कारण लवकरच या विश्वचषक सामन्यावर एक डॉक्युमेंटरी वेब सिरीज बनवली जाणार आहे. डॉक्युमेंटरी वेब सिरीज इंटरनॅशनल प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली चित्रित होणार आहे.

टी 20 विश्वचषक 2007 वर बनवण्यात येणाऱ्या डॉक्युमेंटरी वेब सिरीजची अधिकृत घोषणा झाली आहे. या वेब सिरीजमध्ये 2007 विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या पंधरा खेळाडूंची भूमिका साकारण्यात येणार आहे.

यूके स्थित प्रोडक्शन फर्म वन वन सिक्स नेटवर्क २००७ च्या टी-२० विश्वचषक वेब सीरिजची निर्मिती करत आहे.

या मालिकेचे दिग्दर्शन आनंद कुमार करत आहेत, ज्यांनी यापूर्वी दिल्ली हाइट्स आणि जिल्हा गाझियाबाद सारखे चित्रपट केले आहेत. आणि या मालिकेचे लेखक सौरभ एम पांडे आहेत, ज्यांनी द काश्मीर फाइल्स, द ताश्कंद फाइल्स, वाणी यांसारख्या चित्रपटांची कथा लिहिली आहे. 


टी-20 विश्वचषक 2007 वर वेब सिरीज कधी प्रदर्शित होणार

या सिरीजमध्ये भारतातील मोठे कलाकार क्रिकेटपटूंच्या भूमिकेत दिसणार असून ही मालिका पुढच्या वर्षाच्या मध्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment