भारत पाकिस्तान सामना रद्द होणार ?
आशिया कपची जोरात सुरवात झाली आहे. परंतू सगळ्यांना उत्सुकता आसते ती भारत वि पाकिस्तान सामन्या ची पण भारत पाकिस्तान सामना रद्द होणार ? आशी चिन्हे दिसत आहेत कारण आता या सामन्याबाबत एक वाईट बातमी आली आहे. त्यामुळे आता आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द होऊ शकतो.

भारत पाकिस्तान सामना २ सप्टेंबरला होणार आहे. आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील लढती श्रीलंकेत घेतल्यास स्पर्धेत पावसाचा चांगलाच व्यत्यय येईल, अशी भीती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली होती.
‘वेदर डॉट कॉम’ संकेतस्थळाने सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता ९० टक्के असल्याचे म्हटले आहे, तर ‘गुगल वेदर’नेही हीच शक्यता वर्तवली आहे. सामन्याच्या दिवशी आर्द्रता ८४ टक्के असेल, तर तापमान २८ अंश. ‘अॅक्यूवेदर’नुसार पावसाची शक्यता ९४ टक्के आहे. आशिया कप २०२३ चे सामने कुठे पाहायचे?
जर ९० टक्के पाऊस पडणार असेल तर हा सामना होऊ शकणार नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचेच डोळे लागलेले आहेत. पण आता हा सामना रद्द झाला तर चाहत्यांसाठी खुप मोठी निराशा होईल हे नक्की..