सौराष्ट्र संघ विजय हजारे ट्रॉफी 2022 चा चॅम्पियन, रुतुराज गायकवाडचे शतक व्यर्थ

सौराष्ट्र संघ विजय हजारे ट्रॉफी 2022 चा चॅम्पियन

शेल्डन जॅक्सनने शानदार शतक झळकावल्यामुळे सौराष्ट्राने आज विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. जॅक्सनच्या नाबाद 133 धावांनी रुतुराज गायकवाडच्या शतकी पारी व्यर्थ गेली कारण सौराष्ट्राने तीन षटके बाकी असताना 249 धावांचे आव्हान ठेवले. हे त्यांचे दुसरे विजय हजारे ट्रॉफी विजेतेपद आहे, ते यापूर्वी २००७-०८ मध्ये जिंकले होते. 

सौराष्ट्र संघ विजय हजारे ट्रॉफी 2022 चा चॅम्पियन
सौराष्ट्र संघ विजय हजारे ट्रॉफी 2022 चा चॅम्पियन
Advertisements

[irp]

सौराष्ट्र संघ विजय हजारे ट्रॉफी 2022 चा चॅम्पियन

महाराष्ट्र संघ पाहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहचला होता. महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या संघात शुक्रवारी (दि. 2 डिसेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयममध्ये हा सामना खेळवला गेला. सौराष्ट्र संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली.

सलामीवीर पवन शाह अवघ्या 4 धावा करत धावबाद झाला. संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत, ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने झंझावती शतक झळकावले. मात्र, नंतर कोणत्याही फलंदाजाला आपली छाप पाडता आली नाही आणि महाराष्ट्र संघ निर्धारीत 50 षटकात 9 गडी गमावत 248 धावा करु शकला.

सौराष्ट्र संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. सलामीवीर हार्विक देसाई अर्धशतक करुन बाद झाला तर शेल्डन जॅकसन याने झंझीवती शतक झळकावले. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment