फुगडी खेळाची माहिती इन मराठी | Phugadi Khel Information in Marathi

Phugadi Khel Information in Marathi । fugadi dance information in Marathi

महाराष्ट्र राज्याला विविध प्रकारच्या संस्कृती लाभलेल्या आहेत त्यातील एक पारंपरिक प्रकार म्हणजे फुगडी होय. फुगडी विकिपीडियाच्या माहिती नुसार २१ प्रकारच्या असतात.

जस की कासव फुगडी, नखुल्या फुगडी, बस फुगडी, लोळण फुगडी, भुई फुगडी,  एक हाती फुगडी’ असे प्रकार आहेत.

fugadi dance information in Marathi | Phugadi Khel Information in Marathi
fugadi dance information in Marathi
Advertisements

फुगडी हा खेळ २, ४, ६ किंवा ८ महिलांच्या किंवा मुलींच्या मध्ये खेळला येतो आणि ८ पेक्षा जास्ती महिलांना किंवा मुलींना हा खेळ खेळता येत नाही.

फुगडी खेळताना मुली किंवा महिला क्रॉस पध्दतीने एकमेकीचे हात पकडतात आणि गाणी, उखाणे, कोडी किंवा काही खेळासंबधित वाक्य रचना किंवा फु बाई फु फुगडी फु असे बोलून फुगडी खेळतात.


भारतातील टॉप १० लोकप्रिय खेळ

फुगडीचे प्रकार | Types of Phugadi

भारतामध्ये पारंपारिक खेळ म्हणून खेळली जाणारी फुगडी हि वेगवेगळ्या प्रकारे खेळली जाते. फुगडीचे प्रकार खाली दिलेली आहेत.

 • बस फुगडी.
 • कासाव फुगडी.
 • साधी फुगडी.
 • एक हात फुगडी.
 • नखुल्या फुगडी.
 • भुई फुगडी.
 • दंड फुगडी.

टेबल टेनिस खेळाची माहिती

पाट फुगडी

Phugadi Khel Information in Marathi

पाट फुगडी’ हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार असून त्यात एकच स्त्री भिंतीला पाट टेकवून त्यावर हातांनी चुटक्या वाजवत व नाचत ही फुगडी खेळते.

चुटक्यांचा व पायातील जोडव्या-मासोळ्यांचा पाटावर होणारा नाद यांतून एक लय निर्माण होते. 

फुगड्यांची निरनिराळी गाणी व उखाणे म्हणजे पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली, लोकसंस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणारी लोकगीतेचे होत.

फुगड्यांच्या काही उखाण्यांतून स्त्रिया कधी परस्परांची गुणवर्णने तर कधी थट्टामस्करी करताना आढळतात. काही उखाण्यांतून गंमतीदार प्रश्नोत्तरेही आढळतात.

शब्दांचा सुंदर नाद व एक प्रकारची धावती लयही काही उखाण्यांतून आढळते.

उदा. : ‘आरंड्यावर करंडा करंड्यावर मोर | माझ्यासंगं फुगडी खेळती चंद्राची कोर |’ सणासमारंभाचे उत्साहपूर्ण व चैतन्यमय वातावरण, फुगड्यांच्या नाचांतील विविध गतिविभ्रम आणि गाणी-उखाणे यांतील गेयता व हास्यविनोद यांच्या संयोगामुळे हा खेळप्रकार मोठा वेधक व वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.


भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षकांची यादी
Advertisements

फुगडी कशी खेळली जाते । How to Play Phugadi

महाराष्ट्रातील मुली व स्त्रिया यांच्यात लोकप्रिय असलेला एक खेळ. महाराष्ट्रीय लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पारंपरिक लोकनृत्यांमध्येही त्याची गणना होते.

या नृत्यात दोन किंवा जास्तीत जास्त आठपर्यंत मुली भाग घेऊ शकतात. मात्र दोन मुलींमध्ये खेळावयाच्या फुगड्यांचे प्रकार जास्त दिसतात.

या नृत्यप्रकारात दोन मुली वा स्त्रिया समोरासमोर उभ्या राहून हातांचा तिढा घालून एकमेकींचे तळहात पकडतात. नंतर मागे रेलून व पाय जुळवून गरगर फिरतात.

फिरताना एखादे गाणे म्हणतात; एकमेकींना उखाणे घालतात, किंवा तोंडाने पिंगा घालतात; अथवा ‘पक् पक्’ असा आवाज काढतात, या आवाजाला ‘पक्‌वा’ म्हणतात.

त्या हळूहळू गिरक्यांचा वेग वाढवितात. दोघींपैकी एखादी दमली म्हणजे आपोआप फुगडी थांबते. या खेळात खूप व्यायाम होतो. स्त्रिया मंगळागौर, नवरात्र उत्सव इ. प्रसंगी हा खेळ खूप उत्साहाने खेळतात.

या खेळाचे अनेक प्रकार आहेत. ते विशिष्ट प्रकारे फुगडी खेळण्याच्या पद्धतीवरून पडले आहेत. 

उदा., ‘एक हाती फुगडी’, ‘दंड फुगडी’, ‘बस फुगडी’, ‘लोळण फुगडी’, ‘भुई फुगडी’, ‘कासव फुगडी’, ‘नखुल्या’, ‘जाते’ इत्यादी.


अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – Facts about phugadi game

 • फुगडी या खेळाचे एकूण ७ प्रकार आहेत.
 • फुगडी हा खेळ महाराष्ट्रातील पारंपारिक खेळ आहे.
 • फुगडी हे महाराष्ट्र आणि गोव्याचे लोकनृत्य आहे.
 • फुगडी खेळताना मुली किंवा महिला क्रॉस पध्दतीने एकमेकीचे हात पकडतात आणि गाणी, उखाणे, कोडी किंवा काही खेळासंबधित वाक्य रचना किंवा फु बाई फु फुगडी फु असे बोलून फुगडी खेळतात.
 • पूर्वीच्या काळी नवीन लग्न झालेल्या मुली जेंव्हा माहेराला जात होत्या त्यावेळी त्या माहेरच्या लोकांच्याबरोबर म्हणजेच मैत्रिणींसोबत किंवा बहिणींसोबत फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त करत होत्या.
 • या खेळामध्ये स्त्रिया किंवा मुली एकमेकीचे हात पकडून उड्या मारत गोल फिरतात.
 • फुगडी हि सामान्यपणे भाद्रपद महिन्यात खेळली जाते कारण स्त्रियांना त्यांच्या सामान्य नीरस वेळापत्रकातून तात्पुरती विश्रांती किंवा त्यांचे मनोरंजन व्हावे या उद्देशाने पूर्वी फुगडी हा खेळ खेळला जात होता.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment