मराठमोळ्या रुद्रांश पाटील इजिप्तमध्ये सुर्वणपदक पटकावले
महाराष्ट्राच्या नेमबाज सुपुत्र रुद्राक्ष पाटीलने इजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या प्रेसिडेंट चषकाच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव मोठे केले.

मराठमोळ्या रुद्रांश पाटील इजिप्तमध्ये सुर्वणपदक पटकावले
इजिप्तची राजधानी कैरो येथे प्रेसिडेंट चषकाचे सामने पार पडले. यावेळी रुद्राक्षने (Rudransh Patil Shooter) 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
विशेष म्हणजे या कामगिरीमुळे सुवर्ण लक्ष्याने जागतिक नेमबाज ऑफ द इयर जिंकणारा पहिला भारतीय रुद्राक्ष ठरला आहे. तसेच, त्याला 15000 डॉलर (सुमारे 12 लाख भारतीय रुपये) बक्षीस मिळाले आहे.
नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर जागतिक क्रमवारीतील पहिल्या 12 नेमबाजांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला. इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट फेडरेशन (ISSF) ने या स्पर्धेसाठी टॉप 12 नेमबाजांची निवड करून स्पर्धेचे आयोजन केले होते.
रुद्रांक्ष पाटीलने पात्रता फेरीत ६३०.१ गुण मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्याने ऑलिम्पिक विजेत्यांना पराभूत केले आणि सामन्यावर वर्चस्व राखून अंतिम फेरीत प्रवेश केला.
रुद्राक्षने डॅनिलोचा 16/10 च्या फरकाने पराभव करत सुवर्णपदक जिंकले.
Men's 10m Air Rifle at the ISSF President's Cup in Cairo, Egypt:
— Indian Shooting (@indianshooting) December 3, 2022
🥇Rudrankksh Patil 🇮🇳
🥈Danilo Sollazzo 🇮🇹
🥉Patrik Jany 🇸🇰
🥉Istvan Peni 🇭🇺 pic.twitter.com/ScZ6N0rLU5