मोठी बातमी ! रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये बिनसले, पण का?

मोठी बातमी ! रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये बिनसले, पण का?

महान फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो आणि मॅंचेस्टर युनायटेड वेगवेगळे झाले आहेत. युनायटेडने रोनाल्डोला क्लबमधून मुक्त केल्याचे निवदेनही जाहीर केले आहे. पण आसे काय झाले?

मोठी बातमी ! रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये बिनसले, पण का?
क्रिस्तियानो रोनाल्डो
Advertisements

[irp]

रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये बिनसले

क्लबने आपल्या अधिकृत ट्विटवर अकाउंटवरून मंगळवारी 22 नोव्हेंबर 2022 रोजी याची माहिती दिली. दोघांच्या संमतीमुळेच करार संपुष्टात आल्याचे समोर पुढे येत आहे. त्याचबरोबर क्लबने रोनाल्डोला भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या.

रोनाल्डो म्हणाला :

“मला मँचेस्टर युनायटेड आवडते आणि मी चाहत्यांवर प्रेम करतो, ते कधीही बदलणार नाही. तथापि, नवीन आव्हान शोधण्याची ही माझ्यासाठी योग्य वेळ आहे असे वाटते.”

क्लबच्या निवेदनात असे लिहिले आहे: “क्रिस्टियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड परस्पर कराराने, तात्काळ प्रभावाने सोडणार आहे.

“ओल्ड ट्रॅफर्डमधील दोन स्पेलमध्ये त्याने 346 सामन्यांमध्ये 145 गोल केल्याबद्दल क्लब त्याचे आभार मानतो आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

“मँचेस्टर युनायटेडमधील प्रत्येकजण एरिक टेन हॅगच्या नेतृत्वाखाली संघाची प्रगती सुरू ठेवण्यावर आणि खेळपट्टीवर यश मिळवून देण्यासाठी एकत्र काम करण्यावर लक्ष केंद्रित करतो.”

स्वतःचे विधान जारी करताना, रोनाल्डो म्हणाला: “मँचेस्टर युनायटेडशी झालेल्या संभाषणानंतर आम्ही आमचा करार लवकर संपवण्यास सहमती दर्शविली आहे.

“मला मँचेस्टर युनायटेड आवडते आणि मला चाहत्यांवर प्रेम आहे, ते कधीही बदलणार नाही. तथापि, नवीन आव्हान शोधण्याची ही माझ्यासाठी योग्य वेळ आहे.

“मी संघाला उर्वरित हंगामासाठी आणि भविष्यासाठी प्रत्येक यशासाठी शुभेच्छा देतो.”


रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये बिनसले, पण आसे का झाले?

हा निर्णय एका वादग्रस्त मुलाखतीनंतर घेण्यात आला आहे ज्यामध्ये 37 वर्षीय क्रिस्टियानो रोनाल्डोने क्लबवर टीका केली आणि मॅनेजर एरिक टेन हॅगबद्दल त्याला “आदर नाही” असे सांगितले.

रोनाल्डोने मॉर्गनला दिलेल्या या मुलाखतीत सांगितले की, “ऍलेक्स फर्ग्युसन गेल्यानंतर क्लबची प्रगती झालेली नाही. मॅनेजर एरिक टॅन हॅग याच्याबाबत माझ्या मनात आदर नाही, कारण तो ही मला आदर सन्मान देत नाही. जर तुम्ही मला सन्मान देत नसाल तर मग मी पण का देऊ.”

क्रिस्टियानो रोनाल्डोच्या आश्या बोलण्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment