Kho Kho Information in Marathi
भारतातील पारंपारिक खेळांमधील एक ‘‘खो खो’’ हा खेळ आहे आणि हा आज देखील पुर्वीप्रमाणेच आवडीने आणि उत्सुकतेने खेळला जातो.
या खेळाची सुरूवात इतिहासकारांच्या मता प्रमाणे महाराष्ट्रातुन झाली. आज आपण खो खो खेळाची माहिती बघणार आहोत.
इतिहास | History of Kho Kho Game
- खो खो या खेळाचा उगम महाराष्ट्राच्या मातीतच झाला.
- १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली.
- १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली.
- १९५९-६० साली भारत सरकारने आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली.
जगातील १० सर्वोत्तम यष्टिरक्षक
Kho-Kho Information in Marathi
खो खो खेळाची माहिती मराठी (Kho Kho information in marathi)
खेळाचे नाव | खो खो |
खेळाचा प्रकार | मैदानी खेळ |
खेळातील खेळाडूंची संख्या | मैदानात खेळणारे ९ आणि राखीव ३ असे एकूण १२ खेळाडू |
खो खो च्या क्षेत्रातील डाव | २ डाव (४ वेळा) |
चौरसांची संख्या | ८ |
चौरसात बसणारे खेळाडू | अनुधावक |
पकडणारा खेळाडू | सक्रिय अनुधावक |
खो-खो मैदानाचा आकार | आयताकृती |
खो-खो मैदानाची लांबी | २९ मीटर |
खो-खो मैदानाची रुंदी | १६ मीटर |
एका खेळासाठी दिलेला वेळ | ४० मिनटे |
खो- खो खेळाचे नियम । Rules of Kho – Kho Game
- खो-खो मध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. परंतु एका वेळेस ९ खेळाडू खेळतात.
- खेळ दोन भागांमध्ये विभागला जातो. दोन भागांमध्ये ५ मिनिटे विश्रांतीचा कालावधी असतो.
- प्रत्येक भागात पुन्हा दोन उपभाग असतात. त्यातील पहिल्या उपभागात पहिला संघ पाठलाग करतो व दुसरा संघ बचाव करतो.
- दुसऱ्या उपभागात पहिला संघ बचाव करतो तर दुसरा पाठलाग करतो. दोन्ही उपभगांमध्ये २ मिनिटे विश्रांतीचा काळ असतो.
- संपूर्ण खेळ साधारणतः ३७ मिनिटे (७+२+७+५+७+२+७) चालतो.
- खेळाच्या सुरुवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील आठ चौकोनांत आळीपाळीने विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात.
- नववा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो.
- बचाव करणाऱ्या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात. खेळ सुरू झाल्यावर पाठलाग करणाऱ्या सघांचा नववा खेळाडू बचाव करणाऱ्या संघाच्या तीन खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करतो.
- पाठलाग करणाऱ्या खेळाडूवर खालील बंधने असतात.
- एकदा एका खांबाकडील दिशा पकडल्यावर तो आपली दिशा बदलू शकत नाही (खांबाला स्पर्श करून तो आपली दिशा बदलू शकतो)
तो दोन खांबाना जोडणारी रेषा ओलांडू शकत नाही पळण्याची दिशा बदलण्यासाठी पकडणारा खेळाडू इतर खेळाडूंना खो देऊ शकतो.
खो देण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे घडते.
- पळणारा खेळाडू मैदानाच्या ज्या बाजूस असेल, त्या बाजूस तोंड करून बसलेल्या खेळाडूलाच तो खो देऊ शकतो.
- खो देताना पळणारा खेळाडू खो दिल्या जाणाऱ्या खेळाडूच्या पाठीवर थाप मारुन ‘खो’ असा आवाज करतो.
- खो घेतलेला खेळाडू मग, त्याचे तोंड असलेल्या बाजूस उजव्या किंवा डाव्या दिशेस (पकडण्यासाठी) पळण्यास सुरुवात करतो.
- ज्याने खो दिलेला आहे तो खेळाडु, खो घेतलेल्या खेळाडुची जागा घेतो.
वरील प्रकारे खो-खोची साखळी सुरू रहाते.
बचाव करणाऱ्या खेळाडूवर मैदानात पळताना कोणतेही निर्बंध नसतात. कोणताही बचाव करणारा खेळाडू खालील प्रकारांनी बाद होऊ शकतो
- पकडणाऱ्या खेळाडूने (बचाव करणाऱ्या खेळाडूस) तळ हाताने स्पर्श केल्यावर
- बचाव करणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्यास
- खेळाडूने मैदानात उशीरा प्रवेश केल्यास
- बचाव करणाऱ्या संघाचे तीनही खेळाडू बाद झाल्यावर पुढचे तीन खेळाडू मैदानात प्रवेश करतात.
- नवीन खेळाडूंनी पुढचा खो देण्याआधी मैदानात उतरणे आवश्यक असते. अन्यथा त्यांना बाद धरण्यात येते.
- बाद केलेल्या प्रत्येक खेळाडूया बदली प्रतिस्पर्धी संघाला एक गुण मिळतो. पहिल्या भागाच्या अखेरीस प्रत्येक संघाचे गुण बघितले जातात.
- ज्या संघाचे गुण जास्त, त्या संघाची विरुद्ध संघावर दोन्ही संघांमधील गुणांच्या फरकाइतकी आघाडी धरली जाते. दुसऱ्या भागाच्या अखेरीस, जो संघ आघाडी मिळवितो तो संघ त्या आघाडीने विरुद्ध संघावर मात करतो.
जगातील ५ सर्वोत्कृष्ट क्रिकेट पंच
खो- खो मैदान | Kho – Kho Ground
खो-खो खेळण्याचे क्षेत्र आयताकृती आहे. ते २७ बाय १६ मीटर आहे. आयताची आतील बाजू १६ मीटर आणि दुसरी बाहेरील बाजू १.५० मीटर आहे. या दोन आयतांच्या मध्यभागी दोन लाकडी खांब आहेत.
मध्यवर्ती रस्ता २४ मीटर लांब आणि ३० सेंमी रुंद आसतो.
- एकूण क्षेत्राची आवश्यकता 30m x 19m (सर्व बाजूंनी 1.5m रुंद असलेल्या लॉबीसह.)
- दोन्ही ध्रुवांच्या मागे 1.5m x 16m मुक्त क्षेत्रासह खेळण्याचे क्षेत्र 27m x 16m.ghtv
- ध्रुव अंतर 24m मध्यवर्ती लेन दोन ध्रुवांना जोडणारी 24m लांबी x 30cm रुंदी.
- क्रॉस लेन 8 न. मध्यवर्ती लेनला छेदत आहे. प्रत्येक लेन 16m x 35m.
- खांबाचा आकार – उंची (जमीन पातळीच्या वर – 120 सेमी ते 125 सेमी, व्यास 9-10 सेमी.)
- या खेळामध्ये संघामध्ये प्रत्येकी 12 खेळाडू (आशियाई खो – खो फेडरेशनच्या नियमांनुसार प्रत्येकी 15 खेळाडू) असलेले दोन संघ आहेत तर प्रत्यक्षात फक्त 9 खेळाडू खेळत आहेत.
- सामन्यात 4 वळणे आहेत ज्यात दोन बचाव आणि दोन चेस वळणे आहेत.
- प्रत्येक वळण 9 मिनिटांचा असतो.
- प्रत्येक पुट-आउट डिफेंडर पाठलाग करणाऱ्या संघासाठी एक गुण आणतो.
- उच्च गुण मिळवणारा संघ विजेता म्हणून घोषित केला जातो.
- गेममध्ये संरक्षण तसेच ट्रॅकिंग कौशल्ये असतात.
- संरक्षण: सिंगल चेन, डबल चेन, रिंग गेम, डोजिंग आणि फेकिंग.
- पाठलाग करणे: धावणे, पोल डायव्ह करणे, खांबावर फसवणे (निर्णय) खो, उशीर झालेला खो, क्रॉस लेनमध्ये जाणे इ.
काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती
- खो-खो खेळ खेळाडुंमध्ये सांघिक भावना निर्माण करतो. मुख्यतः आत्मरक्षण,आक्रमण आणि प्रतिस्पध्र्यावर आक्रमण ही कौशल्य या खेळामुळे प्राप्त होतात.
- या खेळाचे जन्मस्थान महाराश्ट्र असुन काहींच्या मते ते बडौदा आहे. गुजरात,महाराश्ट्र आणि मध्यप्रदेशात खो-खो मोठया प्रमाणात खेळला जातो.
- खो-खो खेळात कुठल्याही साहित्याची गरज पडत नाही केवळ खेळाच्या दोन बाजुला दोन खांब उभे करायचे बाकी कुठल्याही साहित्याची गरज हा खेळ खेळतांना पडत नाही.
- या खेळाकरता १११ फुट लांब आणि ५१ फुट रूंद मैदानाची आवश्यकता असते.
- दोन्ही संघाना एक-एक खेळाकरता प्रत्येकी सात मिनीटं देण्यात येतात आणि दिलेल्या वेळेत त्या संघाला आपला डाव पुर्ण करावा लागतो.
- हा खेळ सरळ साधा आणि सोप्या पध्दतीने खेळला जातो यात कोणत्याही प्रकारचा धोका नसुन स्त्री-पुरूश दोघेही अगदी समान पातळीवर हा खेळ खेळु शकतात.
खो-खो पुरस्कार । Kho-Kho award
खो-खोच्या खेळात खेळाडूंना भारत सरकारकडून पुढील पुरस्कार मिळतात.
- अर्जुन पुरस्कार
- एकलव्य पुरस्कार (पुरुषांसाठी)
- राणी लक्ष्मीबाई पुरस्कार (महिंलांसाठी)
- अभिमन्यू पुरस्कार (१८ वर्षे वयोगटाखालील मुलांसाठी)
- जानकी पुरस्कार (१६ वर्षे वयोगटाखालील मुलींसाठी)
नियुक्त अधिकारी:
- अम्पायर (दोन)
- रेफरी (एक)
- टाइम किपर (एक)
- स्कोरर (एक)
अम्पायर
अम्पायर हा लाॅबी च्या बाहेर उभा असतो आणि नियमानुसार आपल्या स्थानावरून खेळाकडे लक्ष देतो. प्राप्त अधिकारात तो निर्णय देतो त्याशिवाय निर्णय देण्यात तो दुसऱ्या अम्पायर ची मदत देखील करू शकतो.
रेफरी
- रेफरी ची कर्तव्य याप्रमाणे आहेत.
- तो अम्पायरचे त्याच्या कर्तव्य पालनात सहाय्य करतो आणि त्यांच्यात निर्णयावरून मतभेद झाल्यास आपला निर्णय देतो.
- खेळात बाधा पोहोचवणाऱ्या, असभ्य वर्तन करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळांडुना दंड देण्याचा अधिकार रेफरी ला आहे.
- नियमांच्या व्याख्येसंबंधी प्रश्नांवर तो आपला निर्णय देतो.
टाईम किपर
वेळेचे रेकाॅर्ड ठेवणे हे टाईम किपरचे महत्वाचे कार्य आहे. शिटी वाजवुन डाव आरंभ आणि संपल्याचा तो संकेत देतो.
स्कोरर
खेळाडु नियोजीत क्रमाने मैदानात उतरले आहेत की नाही हे पाहाणे, बाद झालेल्या रनर चे रेकाॅर्ड ठेवणे, प्रत्येक डावाच्या अखेरीस स्कोर शिट वर गुण लिहीणे आणि धावकांचे स्कोर तयार करणे ही कामं स्कोरर ची जवाबदारी असते. सामन्याच्या अखेरीस सामन्याचा परिणाम तयार करून रेफरी ला घोशीत करण्याकरता देखील स्कोरर देत असतो.
स्पर्धा
भारतामध्ये खो-खोच्या खालील स्पर्धा आयोजित केल्या जातात.
- राष्ट्रीय स्पर्धा
- राष्ट्रीय कुमार स्पर्धा
- राष्ट्रीय निम्नस्तरीय कुमार स्पर्धा
- ii) आंतरशालेय (उच्च्माध्यमिक) स्पर्धा
- आंतरशालेय (माध्यमिक) स्पर्धा
- आंतरशालेय प्राथमिक स्पर्धा
- राष्ट्रीय महिला स्पर्धा
- आंतर्विद्यापीठ स्पर्धा
एकलव्य पुरस्कार विजेते । EKLAVYA AWARD WINNERS
एकलव्य हा पुरस्कार भारतीय खो-खो महासंघातर्फे आयोजित केले जाणा-या राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ गटाच्या अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत अष्टपैलू खेळ करणाऱ्या पुरुष खेळाडूस दिला जातो.
२०१० पुढील पुरस्कार विजेत्यांची नावे
वर्ष | विजेता नाव | स्पर्धा स्थळ |
२०१०-११ | श्री. अमोल जाधव | मुंबई |
२०११-१२ | श्री. राहुल तामगावे | पांगलूरु, आंध्र प्रदेश |
२०१२-१३ | श्री. योगेश मोरे | बारामती, महाराष्ट्र |
२०१३-१४ | श्री. मनोज पवार | वास्को, गोवा |
२०१४-१५ | श्री. विलास करंडे | बेंगलुरू, कर्नाटक |
२०१५-१६ | श्री. मिलिंद चावरेकर | सोलापूर महाराष्ट्र |
२०१६-१७ | श्री. दीपेश मोरे | नागपूर, महाराष्ट्र |
२०१७-१८ | श्री. अमित सावंत | कोल्हापूर, महाराष्ट्र |
२०१८-१९ | श्री. प्रतिक वाईकर | जयपुर, राजस्थान |
राष्ट्रीय खो-खोमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली
उना येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर संपन्न झालेल्या ३१व्या सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिपमध्ये मुले आणि मुली या दोन्ही गटात महाराष्ट्राने सुवर्णपदक पटकावले.
मुलांच्या विभागात कर्नाटकने रौप्यपदक जिंकले, तर पश्चिम बंगाल आणि हरियाणा यांना कांस्यपदकासाठी संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. मुलींच्या गटात पंजाबने रौप्यपदक तर राजस्थान आणि दिल्लीला कांस्यपदकासाठी संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.
या स्पर्धेत २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५१ संघ सहभागी झाले होते.
FAQ About Kho kho In Marathi
प्रश्न : खो खो खेळात किती खेळाडू असतात?
उत्तर : एकूण १२ खेळाडू खो खो खेळात असतात. मैदानात खेळणारे ९ आणि राखीव ३.
प्रश्न : खो खो खेळाच्या क्रिडांगणाची लांबी व रुंदी किती आहे?
उत्तर : खो खो खेळाचे मैदान हे २९ मीटर लांब आणि १६ मीटर रुंद असते.
प्रश्न : खो खो या खेळात स्तंभाची उंची किती असते?
उत्तर : खो खो या खेळात स्तंभाची उंची १.२० मीटर असते.
प्रश्न : सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाला कोणता पुरस्कार दिला जातो?
उत्तर : सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाला द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो.
टीपः आम्ही अचूकतेसाठी प्रयत्न करतो. कृपया आम्हाला सांगा की आपल्याकडे खो-खो या खेळाबद्दल अधिक माहिती असल्यास आम्हाला कमेंट च्या माध्यमातून कळवा ती योग्य असल्यास आम्ही या लेखात नक्कीच अपडेट करू.