झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami 200 ODIs) ६ जानेवारी २००२ रोजी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं.
झुलन गोस्वामी
भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीनं न्यूझीलंड येथे सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात आणखी एका विक्रमाला गवसणी घातलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात झुलन गोस्वामी तिच्या कारकिर्दीतील २०० वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० सामने खेळणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या यादीत भारताची कर्णधार मिताली राज अव्वल स्थानी आहे. तिनं आतापर्यंत २२९ एकदिवसीयआंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
आयसीसी महिला विश्वचषकात यापूर्वी झुलन गोस्वामीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५० विकेट घेण्याचा विक्रम रचला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५० विकेट्स घेणारी ती पहिली महिला गोलंदाज ठरली आहे.
कोणत्याही महिला क्रिकेटपटूला आतापर्यंत २०० विकेट्स टप्पाही गाठता आलेला नाही. झुलन गोस्वामी आपल्या कारकिर्दीतील अखेरचा विश्वचषक खेळणार आहे.
झुलन गोस्वामीची कारकीर्द
Jhulan Goswami 200 ODIs
झुलननं ६ जानेवारी २००२ रोजी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ती भारतीय महिला संघाकडून खेळत आहे. २० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिनं ३५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
तिने एकदिवसीय सामन्यात २५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तिनं कसोटी क्रिकेटमध्ये ४४ आणि टी-२० मध्ये ५६ विकेट्स घेतल्या आहेत.