लक्ष्य सेन २१ वर्षात पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला

विश्व चॅम्पियनशिपमध्ये (All England Open Badminton) कांस्य पदाकाची कमाई करणाऱ्या लक्ष्य सेन याने त्याची विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत तो फायनलमध्ये पोहोचला आहे.

ऑल इंग्लंड ओपन २०२२

लक्ष्य सेन २१ वर्षात पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला
Advertisements

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत (All England Open Badminton 2022) भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने त्याची विजयी घोडदौड सुरुच ठेवली असून नुकताच तो अंतिम फेरीत (Final) पोहोचला आहे.

लक्ष्य सेन याने डिफेनडींग चॅम्पियन मलेशियाच्या ली झी झिया (Lee Zii Jia of Malaysia) याला मात देत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

याआधी त्याचा प्रतिस्पर्धी लू गुआंग जू मैदानात न उतरल्याने तो सामना न खेळताच सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. 

काल (१९ मार्च) त्याचा सामना मलेशियाच्या ली झी झिया याच्या विरुद्ध होता. या सामन्यातील विजेता खेळाडू थेट अंतिम फेरीत पोहोचणार होता. अशा वेळी दोघांमध्ये हा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. पहिला सेट लक्ष्यने २१-१३ च्या फरकाने जिंकत सामन्यात आघाडी घेतली.

पण दुसऱ्या सेटमध्ये ली याने पुनरागमन करत १२-२१ च्या फरकाने सेट जिंकत बरोबरी घेतली. पण अखेरचा सेट लक्ष्याने २१-१९ अशा अटीतटीच्या फरकाने नावावर करत सामनाही खिशात घातला. त्यामुळे लक्ष्यला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळालं आहे.

टेबल टेनिस खेळाची माहिती
Advertisements

२१ वर्षात पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय

या विजयासह, लक्ष्य सेन २१ वर्षांत ऑल इंग्लंड ओपन २०२१ च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. ऑल इंग्लंडमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीतील शेवटचा भारतीय खेळाडू माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद होता.

विशेष म्हणजे, गोपीचंदची मुलगी – गायत्री गोपीचंद आज नंतर ट्रीसा जॉलीसह महिला दुहेरी विभागात ऑल इंग्लंड ओपन २०२२ ची अंतिम फेरी गाठण्यासाठी संघर्ष करताना दिसणार आहे.

लक्ष्य ७ वर्षांनंतर ऑल इंग्लंड ओपन फायनलसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला आहे. ऑल इंग्लंड फायनलमधील शेवटची भारतीय शटलर २०१५ मध्ये महिला एकेरीत सायना नेहवाल होती.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment