धक्कादायक ! जपानची जर्मनीवर 2-1 ने मात
कतार येथे सुरू असलेल्या फीफा विश्वचषक 2022 मध्ये बुधवारी जर्मनी विरुद्ध जपान सामन्यातअत्यंत अनपेक्षित निकाल लागला. या सामन्यात जपानने 2014 फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या जर्मनीला 2-1 असे पराभूत केले.
अर्जेंटिनाच्या धक्कादायक पराभावानंतर हा दुसरा धक्का प्रेक्षकांना बसला
धक्कादायक ! जपानची जर्मनीवर 2-1 ने मात
खलिफा इंटरनॅशनल फुटबॉल स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात जर्मनी विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरले होते. जपानने केलेल्या चुकीमुळे जर्मनीला 33 व्या मिनिटाला पेनल्टी बहाल करण्यात आली. या पेनल्टी चा फायदा घेत एल्चे याने जर्मनीला १ गोल मिळवून दिला. पहिल्या हाफमध्ये जर्मनी संघाकडे १ गोलची आघाडी कायम होती.
History being made in front of our very eyes 🔥#FIFAWorldCup | #Qatar2022 pic.twitter.com/dMe8EDUzTD
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 23, 2022
दुसऱ्या हाफमध्ये मात्र खेळ अचानक पलटला. कायले हावर्त्सने केलेला गोल ऑफ साईड दिला गेल्याने जर्मनीला आपला दुसरा गोल नोंदवता आला नाही. जपान संघाने अखेरीस 75 व्या मिनिटाला त्यांना बरोबरी करण्यात यश आले. रित्सू डोआनने गोल करत ही बरोबरी साधून दिली. जर्मनीचा संघ या धक्क्यातून सावरण्याआधीच त्यांना दुसरा धक्का देखील मिळाला. 83 व्या मिनिटाला ताकुमा असानो याने जर्मनीचा कर्णधार मॅन्यूएल नेऊरला चकवत जपानला 2 रा गोल करुन आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीने बरोबर साधण्याचे पूर्ण प्रयत्न केले. मात्र, जपानचा गोलकीपर गोंडा याने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.